News Flash

Video: हार्दिक पांड्या शिरला मुलाखतकाराच्या भूमिकेत, टीम इंडियाची विमानातली मस्ती पाहिलीत का?

भारतीय संघ आयर्लंडमध्ये दाखल

Video: हार्दिक पांड्या शिरला मुलाखतकाराच्या भूमिकेत, टीम इंडियाची विमानातली मस्ती पाहिलीत का?
हार्दिक पांड्याची विमानातली मस्ती

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ नुकताच लंडनमध्ये दाखल झाला आहे. २७ आणि २९ जुनरोजी भारत आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. मात्र लंडनला पोहचेपर्यंत भारतीय संघाने विमानात नेहमीप्रमाणे धमाल-मस्ती केली. विमानात हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहलने हातात बुम घेतल्याचा अभिनय करत मुलाखत घ्यायला सुरुवात केली. आपल्या सहकाऱ्यांना विविध प्रश्न विचारुन हार्दिक पांड्याने विमानात धमाल उडवून दिली. भारतीय क्रिकेटपटूंची ही धमाल बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट केली आहे.

आयर्लंडविरुद्ध २ टी-२० सामने खेळल्यानंतर ३ जुलै पासून भारताचा इंग्लंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2018 7:39 pm

Web Title: watch hardik pandya interviews virat kohli ms dhoni mid air on flight to uk
टॅग : Bcci,Hardik Pandya
Next Stories
1 ११ चेंडू, १ धाव आणि ७ गडी! पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला संघाचा डाव
2 हॉकीपटू सरदार सिंहला शुभेच्छा देताना सचिन तेंडुलकरची घोडचूक, चुकीच्या खेळाडूला दिल्या शुभेच्छा
3 मॅच फिक्सींगच्या वक्तव्यावरुन पाक क्रिकेट बोर्डाची उमर अकमलला नोटीस
Just Now!
X