News Flash

Video: How’s the Josh, High….Sir ! न्यूझीलंड मोहीम फत्ते केलेल्या टीम इंडियाची नवीन घोषणा

भारत मालिकेत ४-१ ने विजयी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अखेरच्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडवर ३५ धावांनी विजय मिळवत, मालिका ४-१ च्या फरकाने आपल्या नावावर केली. फलंदाजीमध्ये अंबाती रायुडू, हार्दिक पांड्या, विजय शंकर, केदार जाधव तर गोलंदाजीत युजवेंद्र चहल, हार्दिक पांड्या यांनी कमाल दाखवली. मालिकेत बाजी मारल्यानंतर पुरस्काराचा चषक हातात घेतल्यानंतर टीम इंडिया ग्रुप फोटोसाठी एकत्र आली, यावेळी संघाने ‘उरी’ या चित्रपटातील How’s the Josh?? हा डायलॉग म्हणत उपस्थितांची दाद मिळवली. या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दरम्यान, गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे अखेरच्या वन-डे सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाला 253 धावांचं लक्ष्य पूर्ण करता आलं नाही. अखेरचा वन-डे सामना 35 धावांनी जिंकत भारताने 5 वन-डे सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली आहे. तब्बल 10 वर्षांनी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडचा संघ 44.1 षटकात 217 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

अवश्य वाचा – IND v NZ : भाऊ…घेऊन टाक ! धोनीचं केदार जाधवला मराठीतून मार्गदर्शन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 8:34 pm

Web Title: watch indian cricket team with unique celebration after new zealand series win
टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 VIDEO : चतुर धोनी वेगवान स्टपिंगच नाही तर धावबादही करतो…
2 IND v NZ : भाऊ…घेऊन टाक ! धोनीचं केदार जाधवला मराठीतून मार्गदर्शन
3 IND vs NZ : हार्दिक पांड्या आणि षटकारांचं हे अनोखं नातं माहिती आहे का?
Just Now!
X