13 December 2017

News Flash

VIDEO : ऑलिम्पिक विजेत्या जिम्नॅस्टिकपटूचा नजर खिळविणारा नृत्याविष्कार

'डान्सिंग विथ द स्टार्स'च्या २४व्या पर्वात सिमोनने भाग घेतला आहे.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 4:51 PM

सिमोनने मॉअनासारखीच वेशभूषा धारण केली होती.

simone-biles-olympics-2016-image-for-inuthजिम्नॅस्टिकपटू सिमोन बिल्सने अलिकडेच ‘डान्सिंग विथ द स्टार्स’मध्ये नृत्य सादर करत नृत्यात आपला कोणी हात धरू शकत नसल्याचे उपस्थिताना दाखवून दिले. ‘डान्सिंग विथ द स्टार्स’च्या २४व्या पर्वात सिमोनने भाग घेतला आहे. प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर साशा फारबरसह ती नृत्याविष्कार सादर करतेय. डिस्नेचा अॅनिमेटेड चित्रपट ‘मॉअना’मधील ‘हाऊ फार आय विल गो’ गाण्यावर तिने साशासह समकालीन प्रकारातील नृत्य सादर केले.

सिमोन आणि साशा नृत्य सादर करत असताना अउली क्रावालहोने ‘हाऊ फार आय विल गो’ हे गाणे लाईव्ह गायले. अउली चित्रपटात मॉअनाला आवाज दिला आहे. चित्रपटातील समुद्राकाठच्या दृश्याप्रमाणेच स्टेजवर देखावा साकारण्यात आला होता. सिमोननेसुध्दा मॉअनासारखीच वेशभूषा धारण केली होती. किंबहूना ती प्रत्यक्षातील मॉअनाच भासत होती. तर तिला नृत्यात साथ देणाऱ्या साशाने माऊची वेशभूषा धारण केली होती.

दोन्ही नर्तकांना या नृत्यासाठी परीक्षकांकडून ३८ गुण देण्यात आले, तर शोमधील अन्य जोडी नोरमनी आणि वाल यांनी ३९ गुण प्राप्त करून गुणप्राप्तीत प्रथम स्थान पटकावले. सिमोन आणि साशाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. उपस्थितांची मने जिंकणारी सिमोन आणि साशा काहीसे कडक असलेल्या परीक्षकांची मने जिंकण्यास कमी पडल्या. गतवर्षीच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिमोनने चार सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावले होते.
simone-biles-dwts-image-for-inuth-1

First Published on April 21, 2017 4:51 pm

Web Title: watch moana inspired flawless performance of olympic gold medalist simone biles in dwts