News Flash

Video : निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर धोनी-रैनाची ड्रेसिंग रुममध्ये गळाभेट

दोन मित्रांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. १५ ऑगस्टला संध्याकाळी सात वाजल्यानंतर धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत आपण निवृत्ती स्विकारत असल्याचं जाहीर केलं. यापाठोपाठ धोनीचा साथीदार सुरेश रैनानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धोनीला शुभेच्छा देत मी देखील तुझ्या मार्गावर चालायचं ठरवलं आहे असं म्हणत निवृत्ती स्विकारली.

अवश्य वाचा – रैनाच्या नावावर असलेले ५ अनोखे विक्रम माहिती आहेत का?…

धोनी आणि रैना हे सध्या चेन्नईत आयपीएलच्या तेराव्या हंगामाची तयारी करत आहेत. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या खेळाडूंसाठी एका शिबीराचं आयोजन केलं आहे. १५ ते २० ऑगस्ट दरम्यान हे शिबीर चालणार आहे. सराव झाल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर भावूक झालेल्या रैना आणि धोनीने गळाभेट करत आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. इतर खेळाडूंनीही त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या. चेन्नई सुपरकिंग्जने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालाधीत आयपीएलचा तेरावा हंगाम युएईत रंगणार आहे. निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी धोनीने CSK चे मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनीवासन यांच्याशी चर्चा केल्याचं समजतंय. चेन्नईकडून पुढचे काही हंगाम खेळत राहणार असल्याचं धोनीने सांगितलं असून भविष्यातही संघाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हायला धोनीला आवडणार आहे…असंही धोनीने CSK प्रशासनाला कळवलं आहे.

अवश्य वाचा – धोनीच्या निवृत्तीवर पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू म्हणते…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 5:29 pm

Web Title: watch ms dhoni and suresh raina share warm embrace at csk training camp in chennai psd 91
Next Stories
1 …म्हणून धोनीने निवृत्तीसाठी १५ ऑगस्टचा दिवस निवडला ! मॅनेजरने दिली महत्वाची माहिती
2 तुझ्यासोबत खेळायला मिळालं हा माझा सन्मान…धोनीच्या निवृत्तीनंतर केदार जाधव भावूक
3 धोनीच्या निवृत्तीवर पाकिस्तानी महिला क्रिकेटपटू म्हणते…
Just Now!
X