News Flash

VIDEO: ‘कॅप्टन कूल’कडून श्वानांना फिल्डिंगचे धडे

झेल टिपण्याच्या कौशल्याची परिक्षा धोनीने घेतली

मैदानात प्रतिस्पर्धी संघाला आवाक करून सोडणाऱया आपल्या अफाट नेतृत्त्व गुणांनी सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवलेला कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वैयक्तिक आयुष्यात बाईक्स आणि कारबाबतीत असलेले प्रेम आपल्याला ठावूकच आहे. पण धोनीचे श्वानप्रेम देखील लपून राहिलेले नाही. धोनीने आपल्या घरी तीन श्वान पाळले आहेत. त्यांनाही धोनी आपला वेळ देतो. यष्टीच्या मागे उभे राहून संघ सहकाऱयांना धडे देणारा धोनी वैयक्तिक आयुष्यात श्वानांना देखील फिल्डिंगचे धडे देतो. धोनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर श्वानांसोबत मस्ती करतानाचा एक छानसा व्हिडिओ ट्विट केला आहे. धोनी आपल्या तीन श्वानांना झेल टिपण्याचे ट्रेनिंग देत असताना व्हिडिओमध्ये दिसतो. श्वानांना चकवण्याचा फंडा वापरून त्यांचे झेल टिपण्याच्या कौशल्याची परिक्षा देखील धोनीने घेतली. याशिवाय, झेल उडवण्याआधी धोनी श्वानांना काही सुचना करताना देखील दिसतो.

कसोटीमधून निवृत्ती आणि एकदिवसीय, ट्वेन्टी-२० संघांच्या नेतृत्त्वपदावरून पायउतार झाल्यानंतर धोनीला वैयक्तिक आयुष्यासाठी खूप वेळ मिळतो. नुकतेच धोनीने आपल्या चिमुकल्या मुलीसोबत मस्ती करतानाचा एक व्हिडिओ ट्विट केला होता. झिवासोबत धोनी हिरवळीवर रांगत असल्याचा व्हिडिओ होता. आगामी काळात धोनीकडे आपल्या कुटुंबियांसाठी बराच वेळ असणार आहे. कारण, आगामी काळात भारतीय संघाचे वेळापत्रक कसोटी मालिकांनी फुल्ल झाले आहे. धोनी आता थेट आयपीएलमध्ये पुण्याच्या संघाचे नेतृत्त्व करताना दिसेल.

A post shared by @mahi7781 on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 2:25 pm

Web Title: watch ms dhoni playing with dogs will make your day
Next Stories
1 चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच भारत-पाकिस्तान भिडणार!
2 करुण नायरने अशी जपलीय आपल्या त्रिशतकी खेळीची आठवण..
3 क्रीडा प्रशिक्षण केंद्रात काजू-बदामाच्या भ्रष्टाचाराची तक्रार, तपासाचे आदेश
Just Now!
X