न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी क्रिकेटच्या इतिहासात विक्रम केला आहे. एकाच षटकात सहा चेंडूवर सहा षटकार ठोकत लिओ कार्टरने आपलं नाव दिग्गज फलंदाजांच्या यादीत नोंदवलं आहे. अशी कामगिरी करणारा लिओ कार्टर क्रिकेटच्या इतिहासातला सातवा फलंदाज ठरला आहे. न्यूझीलंडमधील स्थानिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत कार्टरने हा विक्रम केला. Canterbury vs Northern Knights संघात सामन्यादरम्यान हा प्रकार घडला आहे. पाहा कार्टरचे एकाच षटकातले सहा षटकार…

Northern Knights संघाचा डावखुरा गोलंदाज अँटॉन डेवसिचच्या गोलंदाजीवर कार्टरने हल्ला चढवला. १६ व्या षटकात कार्टरने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. यादरम्यान कार्टरने Canterbury संघाकडून २९ चेंडूत ७० धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याच्या या खेळीत ७ चौकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर Canterbury संघाने Northern Knights संघाने दिलेलं २२० धावांचं आव्हान ७ चेंडू राखून पूर्ण केलं.

याआधी क्रिकेटच्या इतिहासात, गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज), रवी शास्त्री (भारत), हर्षल गिब्ज (दक्षिण आफ्रिका), युवराज सिंह (भारत), रॉस व्हाईटले (इंग्लंड), हजरतउल्ला झजाई (अफगाणिस्तान) यांनी एकाच षटकात सहा षटकार लगावले आहेत.