News Flash

राजस्थान रॉयल्सनं IPLचं केलं ‘भन्नाट’ पद्धतीनं स्वागत, VIDEO पाहून तुम्हालाही येईल हसू

चाहत्यांनीही केलं VIDEO बनवणाऱ्याचं कौतुक

आयपीएल २०२१चा उर्वरित हंगाम पुन्हा सुरू करणार असल्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमी आनंदात आहेत. बीसीसीआयने आज झालेल्या बैठकीत आयपीएलचा हंगाम यूएईत खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लीगचे ३१ सामने खेळवले जातील. त्यामुळे लीगधील सर्व संघही खूष आहेत. अशातच राजस्थान रॉयल्स संघाने एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत आयपीएलचे स्वागत केले आहे.

राजस्थानने ‘हे बेबी’ या बॉलिवूडपटातील गाण्याद्वारे आयपीएलचे स्वागत केले आहे. या गाण्यात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अनुपम खेर आणि शाहरुख खान आहेत. शाहरुख सरप्राईज देत या गाण्यात एन्ट्री घेतो. मात्र, राजस्थानने या व्हिडिओत अक्षय कुमारबदली संजू सॅमसन, अनुपम खेरबदली राहुल तेवतिया, रितेशबदली ख्रिस मॉरिस आणि शाहरुखबदली आयपीएल असे दाखवले आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे. इतकेच नव्हे तर काहींनी अॅडमिनच्या हुशारीचेही कौतुक केले आहे.

 

हेही वाचा – मराठमोळा पॅरा जलतरणपटू सुयश जाधवचा भीमपराक्रम!

आज बीसीसीआयची विशेष बैठक (SGM) घेण्यात आली. यात सदस्यांनी आयपीएल पुन्हा सुरू करण्यास एकमताने सहमती दर्शविली. बीसीसीआय’ टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन भारतातच करण्यासाठी उत्सुक आहे. येत्या १ जूनला होणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) कार्यकारी परिषदेची बैठक निर्णायक ठरणार आहे. परंतु भारतामधील करोनास्थिती आणखी काही महिन्यांनी आढावा घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे.

चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया

 

 

 

आयपीएल २०२१ स्थगित

भारतात करोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 29, 2021 7:23 pm

Web Title: watch rajasthan royals welcome ipl 2021 by a funny video adn 96
Next Stories
1 मराठमोळा पॅरा जलतरणपटू सुयश जाधवचा भीमपराक्रम!
2 इंग्लंडच्या माजी कर्णधाराला रोहितच्या नेतृत्वाखाली खेळायचंय IPL!
3 ऑस्ट्रेलियाची नाजूक अवस्था बघून पाँटिंगला येतेय धोनीची आठवण!
Just Now!
X