News Flash

DRS घेण्यावरुन पंतचा रहाणेकडे ‘बालहट्ट’, रोहितलाही आवरलं नाही हसू; बघा व्हिडीओ

पाहा व्हायरल व्हिडीओ

बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियानं पाच गड्यांच्या मोबदल्यात २७४ धावा चोपल्या आहेत. लाबुशेन यानं दमदार शतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या नटराजन आणि सुंदर या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. नटराजनने २ बळी टिपले. तर वॉशिंग्टन सुंदरनं स्मिथला बाद केलं. अॅडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दारुण पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतानं मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकेत पुनरागमन केलं. तिसऱ्या कसोटी सामना अनिर्णीत राहिल्यामुळे चौथा कसोटी सामना आधिकच रोमांचक झाला आहे. पहिल्या दिवसाखेर नटराजन यानं फेकलेल्या चेंडूवर पंतनं केलेल्या DRS च्या मागणीवर भारतीय संघातील खेळाडूंनाच हसू आवरलं नाही.

८४ व्या षटकांतील ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनच्या बॅटजवळून नटराजनचा चेंडू गेला. टिम पेन यानं फटका मारण्याचा प्रयत्न केला मात्र, चेंडू सरळ यष्टीरक्षक पंतच्या हातात जाऊन थांबला. चेंडू हातात येताच पंतनं पंचाकडे बादची मागणी केली. पंचानी नकार दिल्यानंतर पंतनं कोणताही विचार न करता रहाणेकडे DRS घेण्याची मागणी केली. स्लिपमध्ये उभा उसलेला कर्णधार अजिंक्य रहाणेनं चेंडूनं बॅटची कड लागलेली नाही, असं पंतला समजावलं..त्यानंतर पंतने नाराजी व्यक्त केल्यानंतर त्याच्या या बालहट्टापुढे रहाणेला हसू आवरलं नाही.

आणखी वाचा- IND vs AUS : कुलदीपला संघात स्थान का नाही? अजित आगरकरचा प्रश्न

पंत रहाणेकडून आपल्या जागी जाताना रोहित शर्माकडे आशेच्या नजरेनं पाहिलं. मात्र, रोहित शर्मा आणि पुजारा यांनाही त्याच्या या कृत्याबद्दल हसू आवरलं नाही. त्यानंतर TV स्क्रीनवर चेंडू आणि बॅटमध्ये बरचं अंतर असल्याचं दिसत होतं.

पाहा व्हिडीओ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 2:15 pm

Web Title: watch rishabh pant urges ajinkya rahane for review rohit sharma hilariously laughs him off nck 90
Next Stories
1 IND vs AUS : कुलदीपला संघात स्थान का नाही? अजित आगरकरचा प्रश्न
2 हरयाणा विरुद्ध मुंबईच्या वरिष्ठ संघातून अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण
3 IND vs AUS: लाबूशेनचं दमदार शतक; नवख्या नटराजनचे दोन बळी
Just Now!
X