ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटरच्या विनंतीनंतर एका षटकांसाठी सचिन तेंडुलवकर पुन्हा एकदा मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील सदस्य एलिसे पेरीच्या विनंतीचा मान राखून सचिन तेंडुलकर पुन्हा बॅट हातात घेऊन मैदानात उतरला आहे. पाँटिंग एकादश आणि गिलख्रिस्ट एकादश यांच्यातील चॅरिटी सामन्यातील इनिंग ब्रेक दरम्यान तेंडुलकर एलिसेच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी करताना दिसला. यावेळी सचिनने पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार लगावला. त्यानंतर स्क्वेअर ऑफ विकेटवर फटका मारत दोन धावा वसून केल्या. त्यानंतर दोन चेंडूला मान दिला. अखेरच्या दोन चेंडूलाही सचिनने मान दिला.

भीषण आगीच्या वणव्यामुळे ऑस्ट्रेलिया होरपळला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीत अनेक प्राणी आणि पक्ष्यांना आपला जीव गमावावा लागला. याच जिवघेण्या परिस्थितीमधून ऑस्ट्रेलिया आता कुठे सावरू लागली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले आहेत. रविवारी ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी बुशफायर क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये पॉन्टिंगच्या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सचिन सांभाळत आहे.

सहा महिन्यापासून सुरू असलेली ही भीषण आग अखेर अचानक पडलेल्या पावसामुळं नियंत्रणात आणण्यात सरकारला यश आले. येथील जनजीवन पुर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदतीचा हाक दिली जात आहे. या मदतकार्यासाठी क्रिकेटपटू पुढे आले आहे. याआधी शेन वॉर्ननं आपल्या आवडत्या टोपीचा लिलाव केला करून कोट्यवधींची मदत केली होती.

एलिसे पेरीने काय विनंती केली होती?
भीषण आगीनंतर ऑस्ट्रेलियाच्या पुनर्वसनासाठी तू हातभार लावत आहेस, याचा आनंद आहे. तू चॅरिटी सामन्यातील एका संघाचा प्रशिक्षक आहेस, याची मला जाण आहे, परंतु तुला पुन्हा फलंदाजी करताना आम्हाला आवडेल. यावर आम्ही चर्चाही केली. त्यामुळे तू चॅरिटी सामन्यातील इनिंग ब्रेकमध्ये एक षटक खेळशील का?. या एका षटकातूनही आम्ही काही मदत उभी करणार आहे,”

सचिनचे प्रतिउत्तर-
”मलाही ही संकल्पना आवडली. मला मैदानावर उतरून एक षटक खेळायला नक्की आवडेल. खांद्याच्या दुखापतीमुळे डॉक्टरांनी मला क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले आहे, तरीही मी खेळेल. तुमच्या संकल्पनेतून आशा करतो की आपण पुरेसा निधी गोळा करू शकू.”