28 January 2021

News Flash

Video : … अन् सुरेश रैनाने थेट मारली धोनीला मिठी

धोनी पाठोपाठ सुरेश रैनाही IPL च्या मैदानात

भारतीय संघात एकेकाळी धमाकेदार खेळी करणारी जोडी म्हणजे महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना… या जोडीने आपल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताला अनेक विजय मिळवून दिले. IPL मध्येही या दोघांनी आपल्या संघाला धमाकेदार फलंदाजीच्या बळावर विजेतेपदं मिळवून दिली. मात्र गेल्या वर्षभरापासून हे दोघेही क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहेत. पण IPL 2020 साठी चेन्नई सुपर किंग्जचे दोन स्टार खेळाडू पुन्हा एकत्र आल्याचे दिसले आहे.

CSK ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरेश रैनाची ‘डॅशिंग एन्ट्री’ होताना दिसते. त्यानंतर तो तेथील भिंतीवर लावलेले फोटो पाहतो. तर नंतर CSK च्या चाहत्यांना भावूक करणारा क्षण घडताना दिसतो. तो क्षण म्हणजे सुरेश रैना आपला सहकारी धोनीला मिठी मारतो आणि नंतर इतर सहकाऱ्यांशी गप्पा मारतो.

पाहा हा व्हिडीओ –

भारताचा माजी कर्णधार धोनीदेखील सोमवारी CSK कडून खेळण्यासाठी नेट्समध्ये आला. त्यावेळी धोनीचेही जंगी स्वागत करण्यात आले. गतविजेते मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी चेन्नईच्या खेळाडूंनी दणक्यात सरावाला सुरुवात केली. संघाचा कर्णधार आणि महत्वपूर्ण खेळाडू महेंद्रसिंह धोनीनेही प्रदीर्घ कालावधीनंतर सरावासाठी मैदानात पाऊल ठेवलं. धोनीला सराव करताना पाहण्यासाठी मैदानात अनेक चाहत्यांची गर्दी जमली होती. ज्या क्षणी धोनी सरावासाठी आला त्या क्षणालाच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 12:04 pm

Web Title: watch suresh raina meets ms dhoni and other chennai super kings teammates ahead of ipl 2020 as chinna thala starts trending on twitter video vjb 91
Next Stories
1 कौतुकास्पद! टीम इंडियाची जर्सी देऊन श्रीलंकेच्या क्रिकेटपटूचा सन्मान
2 Video : धोनीला तोड नाही… त्याचा ‘हा’ भन्नाट स्टंट एकदा बघाच
3 दर्जेदार संघाविरुद्धचा पराभव बोध देणारा  – कोहली
Just Now!
X