News Flash

Video : अरे देवा!! भर मैदानात अंपायरचं बघा काय चाललंय…

टी २० सामन्यात घडला हा हास्यास्पद प्रकार

क्रिकेट हा खेळ अत्यंत अनिश्चित असतो. कधी कोणत्या सामन्यात काय होईल हे सांगणं खूप कठीण असतं. कधी एखादा फलंदाज दमदार फटकेबाजी करून सामना जिंकवून देतो, तर कधी एखादा गोलंदाज अप्रतिम भेदक मारा करत प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारतो. कधी एखादा खेळाडू थोडीशी चूक करून सामना गमावण्यास कारणीभूत ठरतो, तर कधी फिल्डर सामन्यात तुफान क्षेत्ररक्षण करून लक्ष वेधून घेतो. पण नुकत्याच झालेल्या एका सामन्यात पंचांनी विचित्र पद्धतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग स्पर्धा सुरू आहे. त्यात अ‍ॅडलेड स्टायकर्स विरूद्ध मेलबर्न यांच्यात सामना झाला. या सामन्यामध्ये एका पंचांने फार विचित्र पद्धतीने सगळ्यांना हसण्यास भाग पाडले. शॉन क्रेग हे पंच स्टंपवरील बेल्स लावण्यासाठी स्टंपजवळ आले. त्यांनी स्टंपवरील बेल्स नीट लावल्या आणि त्यानंतर ते झटपट आपल्या जागी जाण्यासाठी निघाले. या धावपळीत त्यांचा पाय स्टंपजवळ सरकला आणि शॉन क्रेग तिथल्या तिथेच जागेवर धपकन पडले. सुदैवाने त्यांना फारसे लागले नाही पण त्या प्रकारानंतर स्टेडीयममध्ये आणि खेळाडूंमध्ये एकच हशा पिकला.

हा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

The pitch is lava #BBL09

A post shared by KFC Big Bash League (@bbl) on

दरम्यान, या सामन्यात स्ट्रायकर्स संघाचा कर्णधार ट्रेव्हिस हेड याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. जॉनाथन वेल्स (५८) आणि मॅथ्यू शॉर्ट (४१) यांच्या दमदार खेळीच्या बळावर त्यांनी २० षटकात ६ बाद १७३ धावांची मजल मारली. १७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रेनेगेड्स संघाचा डाव ११० धावांवर आटोपला. ब्यु वेब्स्टरची ४९ धावांची खेळी वगळता इतर कोणीही चांगली कामगिरी केली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 12:26 pm

Web Title: watch umpire shawn craig slips hilariously after setting the bails in strikers vs renegades bbl match video vjb 91
Next Stories
1 विरेंद्र सेहवागनं कसोटीची तुलना डायपरशी करत केला ICC च्या प्रस्तावाला विरोध
2 CSK चा खेळाडू संघात परतला; ‘या’ देशाविरूद्ध खेळणार टी २० मालिका
3 इंस्टाग्रामवर विराटचा स्ट्रेट ड्राइव्ह, ईशांत शर्माला ट्रोल करताना म्हणाला….
Just Now!
X