News Flash

Video : चाहत्याची अनोखी आयडीया, भेटवस्तू पाहून खुद्द विराटही झाला अवाक

लंकेविरुद्ध पहिल्या सामन्याआधी विराटला मिळालं खास गिफ्ट

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२० वर्षात नवीन आव्हानासाठी सज्ज झाला आहे. घरच्या मैदानावर भारताला श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या संघांचा सामना करायचा आहे. रविवारी श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या चाहत्याने एक अनोखी भेटवस्तू विराटला दिली. BCCI ने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

गुवाहटी शहरात राहणाऱ्या राहुल पारिख या तरुणाने जुने मोबाईल आणि त्यांच्या तुटलेल्या भागांपासून विराट कोहलीचं एक सुंदर पोर्ट्रेट तयार केलं आहे. सामन्याआधी राहुलने हॉटेलमध्ये विराटची भेट घेत त्याला भेटवस्तू दिली. राहुलची ही कला पाहून विराटही अवाक झाला. आपल्या आवडत्या खेळाडूला समोर बघितल्यानंतर राहुलच्या चेहऱ्यावरचा आनंदही ओसंडून वाहत होता. त्यामुळे नवीन वर्षात भारतीय संघ आता विराटच्या नेतृत्वाखाली कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 1:46 pm

Web Title: watch virat kohli fan name rahul parikh gave him unique portrait of waste mobile parts psd 91
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 Video : या पंतचं करायचं तरी काय??
2 ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा : ज्योतिबा, रामचंद्र, सागर यांना सुवर्ण
3 बिकट परिस्थितीला ‘खो’ देत रंजनची गरुडझेप!
Just Now!
X