News Flash

Video : विराटचा झॅम्पाने घेतलेला हा भन्नाट झेल पाहिला का?

विराटने अतिशय जोरात तो फटका मारला होता...

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात खराब झाली. भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन दोघे खेळायला मैदानात उतरले, पण मुंबईच्या मैदानावर रोहित शर्मा दणकेबाज खेळी करू शकला नाही. रोहित शर्मा १५ चेंडूत १० धावांवर माघारी परतला.

IND vs AUS : ‘हिटमॅन’ स्वस्तात बाद; तरीही मोडला सचिन, विराटचा विक्रम

रोहित बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुलने डाव सांभाळला. या दोघांनी दमदार खेळी करत भारताला शतक गाठून दिले. या दरम्यान धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्या पाठोपाठ लोकेश राहुलही अर्धशतकाच्या नजीक पोहोचला होता, पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. ६१ चेंडूत ४७ धावांवर तो माघारी परतला.

क्रिकेटच्या मैदानात त्याने असं काही केलं की… स्टेडियममध्ये दोन वर्ष ‘नो एन्ट्री’

त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीकडून भारतीयांना खूप अपेक्षा होत्या, पण त्याला त्या अपेक्षांची पूर्तता करता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा याने विराट कोहलीचा स्वत:ताच्या गोलंदाजीवर अफलातून झेल टिपला. १३ चेंडूत १६ धावांवर खेळत असताना विराटने दमदार फटका मारला, पण झम्पाने त्याचा झेल घेत त्याला माघारी धाडले.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, कोहली बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ४ बाद १५६ होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 4:34 pm

Web Title: watch virat kohli wicket adam zampa takes blinder super catch video vjb 91
Next Stories
1 Ind vs Aus : चौथ्या क्रमांकाची जागा ठरतेय विराटसाठी डोकेदुखी
2 IND vs AUS : ‘हिटमॅन’ स्वस्तात बाद; तरीही मोडला सचिन, विराटचा विक्रम
3 क्रिकेटच्या मैदानात त्याने असं काही केलं की… स्टेडियममध्ये दोन वर्ष ‘नो एन्ट्री’
Just Now!
X