आयपीएलचे सामने म्हटले की त्यामध्ये काही मजेशीर प्रसंग हे घडतच असतात. हैदराबाद विरुद्ध दिल्ली यांच्यातील पहिल्या एलिमिनेटर सामन्यात असाच एक प्रसंग घडला. नाणेफेकीसाठी श्रेयस अय्यर आणि केन विल्यमसन हे दोन्ही कर्णधार मैदानावर हजर होते. यावेळी समालोचक संजय मांजरेकर यांनी सर्वांची ओळख करुन देण्याआधीच श्रेयसने नाणं हवेत उडवलं. हे पाहताच संजय मांजरेकरांनी तात्काळ तो प्रकार थांबवत आपल्या मजेशील शैलीत तो प्रसंग सांभाळून घेतला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

दरम्यान, दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर मार्टीन गप्टील आणि वृद्धीमान साहा यांनी आक्रमक सुरुवात केली, मात्र यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत हैदराबादच्या धावगतीवर अंकुश लावला.