करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास ७८ हजार लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द झाल्या आहेत.

BCCI ने धोनीला वगळलं; चाहत्यांमध्ये संतापाची लाट

भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आणि सावधनता बाळगण्याचा सल्ला देत आहेत. पण भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल मात्र सध्या वेगळ्याच विश्वात आहे. क्रिकेट स्पर्धा बंद असल्याने गेले काही दिवस चहल टीकटॉक वर बराच active असल्याचे दिसत आहे.

CoronaVirus : करोनाग्रस्तांसाठी क्रिकेटपटूंनी दान केला अर्धा पगार

चहलने नुकताच एक टिकटॉक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या वडिलांसोबत डान्स करताना दिसतो आहे. तसेच त्या दोघांमधील संवाददेखील फारच मजेशीर आहेत. पाहा तो व्हिडीओ –

दरम्यान, काही दिवसांपूर्वी युझवेंद्र चहलने आपल्या टीक-टॉक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केली होती. त्या व्हिडीओमध्ये चहल आणि एक तरूणी रस्त्याने चालताना दिसत होते. चालता चालता चहल रस्त्यावर बसतो आणि बुटाची लेस बांधतो. त्याचं लक्ष बुटाच्या लेसकडे असल्याचे पाहून ती तरूणी त्याच्याशी थोडासा लपंडाव खेळते. जेव्हा चहल तिची ही मस्ती बघतो तेव्हा तो तिला मस्करीत मारण्यासाठी हात उचलतो, त्यावेळी ती मुलगी भररस्त्यात चहलचे गाल ओढते आणि पळून जाते.
——————————–