अमेरिकन अंतराळ संशोधन संख्या म्हणजेच नासाच्या ‘पर्सिव्हिअरन्स’ने १२ फेब्रवारी रोजी मंगळावर यशस्वीरित्या लॅण्डींग केलं. या मोहिमेमध्ये बग्गीसारखी एक गाडी मंगळावर उतरवण्यात आली असून सूक्ष्म जीवसृष्टीचा शोध घेण्याचे काम ही गाडी करणार आहे. नासाच्या या लॅण्डींगला यश आल्यानंतर जगभरातील वेगवेगळ्या संस्थांकडून नासाचं कौतुक केलं जात आहे. याच कौतुक सोहळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं अगदी हटके ट्विट करत या लॅण्डींगचा संबंध क्रिकेटशी जोडला असून या ट्विटवर क्रिकेटचाहत्यांनाही मजेदार कमेंट दिल्यात.

नक्की पाहा >> पाच वर्ष संशोधन केल्यानंतर निवडला लॅण्डिंग स्पॉट, जाणून घ्या नासाच्या मंगळ मोहिमेचं नदी कनेक्शन

‘पर्सिव्हिअरन्स’च्या मार्स लॅण्डिंगचा काल्पनिक फोटो ट्विट करत आयसीसीने या मोहिमेच्या यशाबद्दल कौतुक केलं आहे. पण या फोटोमध्ये स्टम्प रोवलेलं क्रिकेटचं पीचही दाखवण्यात आलं आहे. कॅप्शनमध्ये, “क्रेकट हे आऊट ऑफ दिस वर्ल्ड आहे, हे आम्ही आधीपासूनच म्हणत आलो आहोत,” असं आयसीसीने म्हटलं आहे. आऊट ऑफ दिस वर्ल्ड या शब्द इंग्रजीमध्ये काहीतरी जगावेगळं केलं असेल तर त्यासाठी कौतुकास्पद किंवा आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे असं सांगण्यासाठी वापरला जातो. येथे आयसीसीने हा शब्द अर्थाच्या दृष्टीने आणि शाब्दिक अर्थ अशा दोन्ही पद्धतीने वापरला आहे. नासाने ‘पर्सिव्हिअरन्स’ मंगळावर उतरवण्याचं जे काम केलं आहे ते भन्नाट आहे तसेच शब्दिक अर्थ घ्यायचा झाला तर ते जगात म्हणजेच पृथ्वीवर कुठेच करता येणार नाही असं काम आहे, असं म्हटलं आहे. तसेच या ट्विटमध्ये नासाचे हे यश म्हणजे सामन्याआधी नाणेफेक जिंकण्यासारखं असून पुढे काय नासा काय करणार असा प्रश्नही आयसीसीने नासाला टॅग करुन विचारला आहे. “वीन द टॉस अॅण्ड…” असं वाक्य या ट्विटमध्ये आहे.

नासाच्या या गुगलीवर नेटकऱ्यांनाही रिप्लायच्या माध्यमातून अनेक फ्री हीट्स लगावले आहेत. पाहुयात काही मजेदार रिप्लाय

१) हे इंग्लंडने बनवलं असणार

२) हे सर्वात धोकादायक गोलंदाज ठरतील

३) पण टॉस करा जिंकणार

४) हे मुंबईत आहे का?

५) तुम्ही आलातच कसे?

६) पीच रिपोर्ट

७) टॉस जिंका आणि…

८) हा सामना आठवला

९) हा खेळाडू पोहचला पण…

१०) हे ट्विट पाहून मोहिमेचे प्रमुख

हे काही मोजके रिप्लाय असले तरी अशाप्रकारच्या शेकडो कमेंट चाहत्यांनी केल्यात. या ट्विटखाली क्रिकेट चाहत्यांनी मंगळावर क्रिकेट सामना ठेवला तर काय होईल यासंदर्भातील कल्पना आपल्या कमेंटमधून व्यक्त करताना धमाल उडवून दिल्याचं पहायला मिळत आहे.