News Flash

Ind vs Eng : आमचं नशीब! जडेजाला आधी संघात घेतलं नाही – इंग्लंड

जडेजाच्या नाबाद ८९ धावांच्या फटकेबाजीमुळे भारताला पहिल्या डावात तीनशे धावांच्या जवळ पोहोचता आले.

भारताविरुद्धच्या अंतिम कसोटीत इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर दीडशेहून अधिक धावांची आघाडी मिळवली. पहिल्या दिवशी ७ बाद १९८ धावांवर असलेल्या इंग्लंडने दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३३२ धावांपर्यंत मजल मारली. मात्र अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या चार बळींमुळे भारताला इंग्लडला रोखण्यात यश आले. त्यानंतरही जडेजाच्या नाबाद ८९ धावांच्या फटकेबाजीमुळे भारताला तीनशे धावांच्या जवळ पोहोचता आले. त्याच्या या पराक्रमाबाबत इंग्लंडचे सहाय्यक प्रशिक्षक यांनी पॉल फ्रारब्रेस यांनी त्याचे कौतुक केले आणि खोचक शब्दात भारतीय संघ निवडीवर टीकाही केली.

जडेजा हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. पाचव्या कसोटीतील त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. मात्र इंग्लंडचे नशीबच म्हणावे लागेल की जडेजाला भारतीय संघाने केवळ शेवटच्या सामन्यात संधी दिली, अशा शब्दात फ्रारब्रेस यांनी मालिकेतील भारतीय संघ निवडीवर खोचक टीका केली.

जडेजा ८व्या क्रमांकावर खेळायला मैदानात उतरला आणि त्याने नाबाद ८९ धावा केल्या. ही खेळी उल्लेखनीय आहे. शेवटचा गडी बाद होण्याआधी जडेजाचा झेल इंग्लंडकडून सुटला. तेव्हा ते मनाला लागले. पण जडेजाला जीवदान मिळाले त्याचे वाईट वाटले नाही. कारण त्याने उत्तम खेळ केला होता, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 4:40 pm

Web Title: we are happy jadeja played just last test says england assistant coach paul farbrace
Next Stories
1 Ind vs Eng 5th test – Live : अखेरच्या सामन्यात भारत लाज राखणार? दिवसअखेर ३ बाद ५८
2 US Open 2018 Men’s Final : जोकोव्हीचचे सलग दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद; हंगामाचा शेवट गोड
3 एकेरीत समीर वर्मा, दुहेरीत रान्किरेड्डी-शेट्टी अजिंक्य
Just Now!
X