भारतीय संघाची गोलंदाजी योग्य आणि भेदक होत होती परंतु, ब्रेन्डनने प्रखर फलंदाजी केली आणि आपले द्विशतक गाठले असे सलामीवीर मुरली विजयने म्हटले आहे.
न्यूझीलंड कर्णधार ब्रेन्डन मॅक्क्युलमने दमदार फलंदाजी करत नाबाद २२४ धावांची खेळी साकारली. मुरली विजय म्हणतो की, दोन्ही बाजूला स्थिती सारखीच होती. नवीन चेंडू असे पर्यंत टीकून फलंदाजी करणे अवघड होते. कारण, ऑकलंडच्या मैदानावर नवीन चेंडु उत्तम फिरकी आणि घातक ठरत होता. जसजसा चेंडू जूना झाला तसे फलंदाजांना सामोरे जाण्यास सोपे जात होते. न्यूझीलंडसोबतही तसेच झाले मधल्या पट्टीत फलंदाजीला उतरलेल्या ब्रेन्डन मॅक्क्युलमला उत्तम फलंदाजी करता आली. भारताच्या बाजूनेही रोहीत शर्मा आणि अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचा डाव उत्तमरित्या सांभाळला आहे. दोघांचाही स्टेडियमवर चांगला जम बसला आहे. त्यामुळे पुढेही चांगली भागीदारी रचून संघाच्या धावसंख्येला ते आकार देतील असा विश्वासही मुरली विजयने यावेळी व्यक्त केला.