एकावेळी केवळ एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करण्यावरच आपला भर असल्याचे स्पष्ट करून भारताचा आघाडीचा फलंदाज अजिंक रहाणे याने आपल्याला कोणत्याही दबावाखाली खेळायचे नसल्याचे म्हटले आहे. रहाणे आणि रॉबिन उथप्पा या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामान्यात सात विकेट्सनी सहज विजय मिळवला. त्या पार्श्वभूमीवर रहाणे बोलत होता.
तो म्हणाला, स्वतःतील कौशल्य दाखवून देण्यासाठी हा दौरा एक उत्तम संधी आहे. अशावेळी आम्हाला कोणत्याही दबावाखाली खेळायचं नाही. कोणत्याही दौऱयातील पहिला सामना आव्हानच असतो. अशावेळी फलंदाजी करताना आत्मविश्वास असणे अत्यंत गरजेचे असते. बांगलादेशमध्ये त्यांच्याविरुद्ध खेळणे हे सुद्धा आव्हानच होते. कारण त्यांचा संघ उत्कृष्ट असून घरातील मैदानावर ते चांगलेच खेळतात. सध्याच्या भारतीय संघात नवोदित आणि अनुभवी खेळाडू हुशार आणि मेहनती असल्याचेही त्याने स्पष्ट केले.