विश्वविजयानंतर शेन वॉटसन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषवण्यासाठी सज्ज झाला आहे. अन्य संघांपेक्षा आमच्याकडे एकहाती सामना फिरवणारे खेळाडू सर्वाधिक आहेत, असे मत वॉटसनने व्यक्त केले.
‘‘राजस्थानच्या संघामध्ये आता चांगलाच बदल झाला असून आमच्याकडे सर्वाधिक एकहाती सामना फिरवणारे खेळाडू आहे. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळलेले राजस्थानच्या संघामध्ये चार खेळाडू आहेत. त्यामुळे ते सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात आहेत. संघामध्ये गुणवान खेळाडूंचा भरणा असून त्यांच्यामध्ये योग्य समन्वयही आहे,’’ असे वॉटसन म्हणाला.
या वेळी संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, ‘‘राजस्थानचा संघ बलाढय़ आणि चांगला समतोल आहे. आमच्याकडे शेन वॉटसन, धवल कुलकर्णी, टीम साऊथीसारखे अष्टपैलू खेळाडू आहेत. आयपीएलमधील आठही संघ चांगलेच तुल्यबळ असून
सर्वोत्तम कामगिरी करण्याचाच आमचा प्रयत्न असेल.’’