करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरातील सर्व क्रीडा स्पर्धा बंद झालेल्या आहेत. बीसीसीआयनेही २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र देशातली सध्याची परिस्थिती पाहता आयपीएलच्या भवितव्याबद्दल अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. भारतीय संघाचे खेळाडूही सध्या आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये RCB चं नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीने इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसनशी इन्स्टाग्रामवर लाईव्ह चॅटमध्ये गप्पा मारल्या. यावेळी विराट कोहलीने RCB च्या IPL मधील कामगिरीवर आपल मत दिलं.

“ज्यावेळी तुमच्या संघात नावाजलेले खेळाडू असतात त्यावेळी सर्वांचं लक्ष तुमच्या संघाकडे असतं. आम्ही आतापर्यंत ३ वेळा अंतिम फेरीत पोहचलो मात्र एकदाही विजयी होऊ शकलो नाही. पण या सगळ्या गोष्टींना काहीच महत्व नाही. संघात सर्वोत्तम खेळाडू असतानाही आम्हाला विजेतेपद मिळवता आलेलं नाही. माझ्यामते एखाद्या गोष्टीसाठी आपण जेव्हा अधिक मेहनत घेतो तितकी ती गोष्ट आपल्यापासून दूर जाते. माझ्या मते आम्हाला संघात खेळीमेळीचं आणि हसरं वातावरण आणणं गरजेचं आहे. प्रत्येक सामन्यात तुम्ही ठरवता तसंच होतं असं नाही.” पिटरसनने विचारलेल्या प्रश्नाला विराट कोहलीने उत्तर दिलं.

संघात अनेक नावाजलेले खेळाडू असतानाही RCB ला आतापर्यंत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही

 

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या ३ संघांचा अपवाद वगळात इतर सर्वांनी विजेतेपदं पटकावली आहेत. बऱ्याचदा विराट कोहलीचा RCB संघ सोशल मीडियावर खराब कामगिरीसाठी ट्रोल होतो. यंदाच्या हंगामासाठी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएल खेळवता येऊ शकतं का याची चाचपणी करत आहे, मात्र यावर अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही.

अवश्य पाहा – IPL 2020 : स्पर्धा रद्द झाल्यास ‘या’ खेळाडूंचं स्थान धोक्यात