भारत आणि पाकिस्तान यांचातील क्रिकेट सामना हा नेहमीच हाय व्होल्टेज ड्रामा असतो. गेले १० ते १२ वर्षे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण कमालीचे तणावपूर्ण आहे. त्यामुळे या दोन संघामध्ये दीर्घकाळापासून क्रिकेट मालिका खेळली गेलेली नाही. करोनाच्या संकटात भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळवण्यात यावी आणि मदत निधी मिळवावा असा सूर पाकिस्तानकडून लावण्यात आला, पण भारताने ठामपणे याला नकार दिला. पण आधी मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक क्रिकेट मालिका रंगल्या होत्या. त्यापैकी १९७८-७९ मध्ये रंगलेल्या क्रिकेट मालिकेबाबत पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांनी आपल्या आठवणी यु ट्यूब च्या माध्यमातून जागा केल्या.

Coronavirus : कौतुकास्पद! पाक क्रिकेट बोर्डाकडून अंपायर्स, ग्राऊंड स्टाफला आर्थिक मदत

१९७८-७९ मध्ये भारतीय संघ पाकिस्तानमध्ये कसोटी मालिकेसाठी गेला होता. भारताच्या या संघात बिशन सिंग बेदी, भगवत चंद्रशेखर आणि इरापल्ली प्रसन्न हे तीन प्रतिभावंत फिरकीपटू होते. जगभरातील विविध मैदानांवर त्यांनी आपल्या फिरकीची जादू दाखवली होती, पण पाकिस्तानच्या खेळपट्टीवर त्यांना फारशी चमक दाखवता आली नाही.

टीम इंडियाचं प्रशिक्षक व्हायचंय – शोएब अख्तर

या कसोटी मालिकेत जहीर अब्बास आणि जावेद मियाँदाद यांनी या फिरकीपटूंना चांगला चोप दिला आणि मालिका २-० ने जी केली. याबाबत बोलताना जावेद मियाँदाद म्हणाला, “चंद्रशेखर, बेदी, प्रसन्न… हे त्रिकुट भारताची ताकद होते. फिरकीपटू हेच भारतीय संघाचे बलस्थान होते. जगभरात त्यांनी उत्तम कामगिरी केली. पण ते जेव्हा पाकिस्तानात आले तेव्हा त्यांना यश मिळू शकले नाही. आम्ही त्यांची यथेच्छ धुलाई केली,” असे जावेद मियाँदाद म्हणाला.

विराटला गोलंदाजी की बुमराहसमोर फलंदाजी? महिला क्रिकेटपटूने दिलं हे उत्तर

“मला हे पण आठवतंय की जहीर अब्बासना चंद्रशेखरच्या गोलंदाजीवर धावा काढायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी मला चंद्रशेखरचे चेंडू खेळायला सांगितले आणि त्यांनी दुसऱ्या दोन गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्यानंतर मी जहीरभाईंना म्हंटलं की मला पण थोड्या धावा बनवू द्या. त्यानंतर आम्ही दोघांनी फिरकीपटूना चोप दिला,” अशी आठवण देखील मियाँदादने सांगितली.