नुकतीच झालेली विंडीजविरुद्धची मालिका भारताने २-० अशी निर्विवाद जिंकली. या मालिकेसाठी नवोदित पृथ्वी शॉ याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात १३४ धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात विजयी फटका लगावत भारताला मालिका विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याचे सर्व स्तरातून कौतुक झाले. कर्णधार विराट कोहली यानेही त्याची स्तुती केली.

पृथ्वी हा एक असा खेळाडू आहे जो संघाला अपेक्षित सुरुवात मिळवून देतो. विशेषकरून पहिल्या मालिकेत खेळताना त्याने उत्तम खेळ केला. अशा प्रकारचा निर्भीड आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण खेळाडू संघात असणे हे चांगले लक्षण आहे. आम्हा कोणतही १८-१९ वर्षांचे असताना त्याच्याएवढ्या वयाचे असताना असेही विराट म्हणाला.

पृथ्वी हा अत्यंत परिपक्व खेळाडू आहे. तो अतिशय संयमी खेळी करत असतो. आता नक्की तो चेंडू हवेत टोलवेल असे वर असते, पण तो अजिबात धीर सोडत नाही. शांतपणे खेळी करतो. इंग्लंड दौऱ्यात आम्ही त्याला सराव सत्रात खेळताना पहिले आहे. तो नवा चेंडू आक्रमकपणे टोलवतो, पण त्यावर त्याचे संपूर्ण नियंत्रण असते. असे करणे फार अवघड असते. इतकी प्रतिभा त्याच्याएवढ्या वयाचे असताना या संघातील कोणातही नव्हती, असेही कोहली म्हणाला.