News Flash

परदेशी खेळाडूंच्या परतीसाठी मार्ग काढू -ब्रिजेश पटेल

परदेशी खेळाडूंना आम्ही नक्कीच त्यांच्या घरी सहीसलामत पोहोचवू.

नवी दिल्ली : जैव-सुरक्षित वातावरणात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करावी लागली असली तरी परदेशी क्रिकेटपटूंच्या मायदेशी परतण्याचा प्रश्न कायम आहे. त्यांच्या परतीसाठी लवकरात लवकर मार्ग काढू, असा विश्वास ‘आयपीएल’चे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केला. ‘‘परदेशी खेळाडूंना आम्ही नक्कीच त्यांच्या घरी सहीसलामत पोहोचवू. त्यासाठी योग्य मार्ग काढण्यात येईल,’’ असे पटेल म्हणाले. सध्या अनेक देशांनी भारतावरील विमानांवर निर्बंध आणल्यामुळे परदेशातील क्रिकेटपटूंच्या मायदेशी परतण्याचा मार्ग आणखीनच कठीण झाला आहे. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूंना त्यांच्या घरी सुरक्षितपणे पाठवण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 2:14 am

Web Title: we will find a way to send back foreign players says pl chairman zws 70
Next Stories
1 IPL २०२१चं आयोजन सप्टेंबर महिन्यात होणार? अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांचे सूतोवाच!
2 IPL २०२१ : ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात राहतील किंवा…
3 भारताच्या मदतीसाठी अजून एका ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची करोना लढ्यात उडी
Just Now!
X