न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी साकारणारा भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहलीने संघातील प्रत्येक फलंदाजाला आणखी जबाबदारीने खेळी करायला हवी असे म्हटले.
पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या २९२ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातून विराट कोहलीला वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराटने तुफान १११ चेंडूत १२३ धावांची खेळी साकारली परंतु, तरीही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलत असताना विराटने संघातील फलंदाज योग्य आहेत. प्रत्येकामध्ये उत्कृष्ट कुवत आहे. परंतु, आम्हाला अजून जबाबदारीने फलंदाजी करावी लागले असे कोहली म्हणाला.
पहिल्या सामन्यात पराभव जरी झाला असला तरी, आमच्यासाठी या मालिकेच्या दृष्टीने चांगली सुरूवात मिळाली असे मी समजतो. कारण, यापुढे प्रत्येकजण सावधगिरीने आणि अचूक फलंदाजी करेल असा मला विश्वास आहे. मलाही यापुढील सामन्यात आणखी चांगली कामगिरी करायची आहे. असेही तो पुढे म्हणाला.
वैयक्तीकरित्या मी या सामन्यातील खेळीवर खुश आहे. मालिकासुरू होण्याआधीच काही दिवस येथे दाखल झाल्यामुळे येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यात मदत झाली. त्याचा उत्तम फलंदाजी करण्यासाठी फायदा झाल्याचे कोहलीने सांगितले.