News Flash

इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीत चांगली कामगिरी करू – सुटील

सहारा फोर्स इंडियाचा ड्रायव्हर एड्रियन सुटीलसाठी फॉम्र्युला-वन शर्यतींचे हे पर्व फारसे फलदायी ठरले नाही. त्याला १२पैकी फक्त ५ शर्यतींमध्ये गुण मिळवता आले.

| September 20, 2013 12:22 pm

सहारा फोर्स इंडियाचा ड्रायव्हर एड्रियन सुटीलसाठी फॉम्र्युला-वन शर्यतींचे हे पर्व फारसे फलदायी ठरले नाही. त्याला १२पैकी फक्त ५ शर्यतींमध्ये गुण मिळवता आले. मात्र पुढील वर्षी फॉम्र्युला-वनच्या वेळापत्रकातून वगळण्यात आलेल्या इंडियन ग्रां. प्रि. शर्यतीत चांगली कामगिरी करण्याचा विश्वास सुटीलने व्यक्त केला.
मोनॅको ग्रां. प्रि. शर्यतीत सुटीलने या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला. ड्रायव्हर्सनी सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण केल्यानंतर पायरेली या टायर पुरवणाऱ्या कंपनीने केलेल्या बदलांशी जुळवून घेणे फोर्स इंडियाला जमले नाही. ‘‘टायर बदलण्यात आल्यानंतर कारवर नियंत्रण ठेवणे कठीण जाऊ लागले आहे. नोएडातील बुद्ध इंटरनॅशनलचे सर्किट खूपच चांगले आहे. त्यामुळे भारतात येण्यापूर्वी मला यश संपादन करायचे आहे,’’ असेही त्याने सांगितले.
‘‘पुढील वर्षीच्या मोसमातून इंडियन ग्रां. प्रि. शर्यत वगळणे, हा आमच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता. संघाच्या भवितव्यासाठी ही निराशाजनक बाब आहे. २०१५मध्ये पुन्हा इंडियन ग्रां. प्रि.चा समावेश होईल, अशी आशा आहे. घरच्या सर्किटवर कार चालवण्याचा अनुभव संस्मरणीय असतो,’’ असे सुटील म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 12:22 pm

Web Title: we will try to be in best shape for indian grand prix adrian sutil
Next Stories
1 विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा : पहिल्याच फेरीत गीता फोगट पराभूत
2 कर्णधार क्लार्कबाबत अनिश्चितता कायम
3 वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा मालिकेवर कब्जा
Just Now!
X