06 March 2021

News Flash

‘आयओसी’च्या खेळाडूंच्या आयोगाकडून स्वागत

ऑलिम्पिक स्पर्धा उन्हाळ्यात घेतल्यामुळे सर्वच खेळाडूंना तयारी करण्याची योग्य संधी

संग्रहित छायाचित्र

 

करोनामुळे एक वर्ष लांबणीवर पडलेल्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्याने मिळालेली शाश्वती उपयुक्त ठरेल, असे मत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) खेळाडूंच्या आयोगाने  मंगळवारी व्यक्त केले. नव्या तारखांचे स्वागतही आयोगाने केले आहे. पुढील वर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार असल्याची घोषणा सोमवारी टोक्यो ऑलिम्पिक संयोजन समितीने केली. यानंतर भारताचा एकमेव वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता खेळाडू अभिनव बिंद्राचा समावेश असलेल्या ‘आयओसी’च्या क्रीडापटूंच्या आयोगाने मंगळवारी परिपत्रक काढले. ‘‘ऑलिम्पिक स्पर्धाच्या तारखा झाल्यास आरोग्य आणि सुरक्षा यांच्याकडे लक्ष केंद्रित करता येईल. तसेच ऑलिम्पिक स्पर्धा उन्हाळ्यात घेतल्यामुळे सर्वच खेळाडूंना तयारी करण्याची योग्य संधी मिळणार आहे,’’ असे आयोगाच्या प्रमुख किस्र्टी कॉव्हँट्राय यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 12:18 am

Web Title: welcome from the iocs players commission abn 97
Next Stories
1 इंग्लिश क्रिकेटपटूंना मैदानावर स्मार्टवॉच वापरास बंदी
2 याला म्हणतात मोठं मन ! मजुरांच्या निवाऱ्यासाठी बायुचंग भूतियाने दिली स्वतःची इमारत
3 Video: जादूचे प्रयोग आणि आता कुत्र्यासोबत कॅचिंग प्रॅक्टिस, श्रेयस अय्यर होम क्वारंटाइनमध्ये रमला
Just Now!
X