News Flash

Welcome Home Abhinandan : अभिनंदन यांच्या शौयाला वीरेंद्र सेहवागचा सलाम

''तुमच्या शौर्याला आणि प्रतिभेला आमचा सलाम''

Welcome Home Abhinandan : अभिनंदन यांच्या शौयाला वीरेंद्र सेहवागचा सलाम

पाकिस्तानने बुधवारी सकाळी केलेला हवाई हल्ला परतवून लावताना विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानच्या दोन एफ-१६ लढाऊ विमानांना खाली पाडले. यानंतर त्यांचे मिग-२१ विमान शत्रूने पाडले. त्यानंतर ते पाकिस्तानात होते. पण ‘शांततेचा संकेत’ म्हणून अभिनंदन यांची आज सुटका करण्यात आली. यानंतर मोठ्या प्रमाणावर त्याच्या स्वागताची वाट पाहणाऱ्यांनी ट्विट आणि संदेश केले.

तो येण्याआधी २ तास भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानेही अभिनंदन यांच्या शौर्याला सलाम केला आहे. अभिनंदन यांच्या स्वागतासाठी त्याने एक खास असा भावनिक संदेश ट्विट केला आहे आणि एक खास फोटो ट्विट केला आहे. ”तुम्ही भारताचे सुपुत्र असल्याचा आम्हाला अभिमान आहे. तुमच्या शौर्याला आणि प्रतिभेला आमचा सलाम”, असा ट्विट त्याने केला आहे.

दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन यांच्या वडिलांनी मुलाला पाठिंबा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल देशावासीयांचे आभार मानले आहेत. त्यांनी एक संदेश जारी केला होता. अभिनंदनचे वडील सिमहाकुट्टी वर्थमान हे एअर मार्शल पदावर कार्यरत होते. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले होते की तुमच्या काळजी आणि शुभेच्छांसाठी आभार. देवाने आमच्यावर कृपादृष्टी ठेवली आहे त्याबद्दल आभार. अभिनंदन सुखरुप घरी परत यावा, यासाठी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत असतील याची खात्री आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 6:46 pm

Web Title: welcome home abhinandan former batsman virender sehwag tweets abhinandan photo sketch and special message
Next Stories
1 IND vs AUS : भारत-पाक तणावामुळे क्रिकेट सामन्यांच्या ठिकाणांत बदल?
2 चौथ्या स्थानावर फलंदाजीला आल्याने माझा खेळ बदलणार नाही – विराट कोहली
3 आयपीएलमधली कामगिरी म्हणजे विश्वचषकाचं तिकीट नाही – विराट कोहली
Just Now!
X