News Flash

विराटपाठोपाठ आणखी एक क्रिकेटपटू झाला बाबा; शेअर केला Photo

तुम्ही पाहिलात का हा फोटो

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या घरी काही दिवसांपूर्वीच चिमुकलीचे आगमन झाले. त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. विराट-अनुष्का यांनी सोमवारी त्या मुलीचं बारसं करून तिचं नाव वमिका असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर विराटपाठोपाठ आणखी एक स्टार खेळाडू बाबा झाल्याची गोड बातमी क्रिकेट चाहत्यांना मिळाली. वेस्ट इंडिजचा अनुभवी फिरकीपटू सुनील नरेनला पुत्ररत्न प्राप्ती झाली.

सुनील नरेनने सोमवारी (०१ फेब्रुवारी) आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून साऱ्यांना ही गोड बातमी दिली. त्याची पत्नी अँजेलिना हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. सुनील नरेनने इंस्टाग्राम अकाउंटवर त्या मुलाचा फोटो पोस्ट केला आणि नव्या पाहुण्यासाठी फोटोला छान कॅप्शन लिहिले. “तू आमच्या हृदयातील अशी जागा भरून काढली आहेस ज्या पोकळीची आम्हाला जाणीवही नव्हती. तुझ्या इवलाश्या चेहऱ्यावर आम्हाला देवाची कृपा आणि दया दिसते आहे. तुला आमचं खूप खूप प्रेम मिळो”, असं कॅप्शन त्याने लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Narine (@sunilnarine24)

आणखी वाचा- …म्हणून विरुष्काने लेकीचं नाव ठेवलं वामिका; जाणून घ्या या नावामागचा अर्थ

सुनील नरेनने नविन पाहुण्याच्या आगमनाची माहितीदेखील इन्टाग्रामवरून दिली होती. २१ ऑक्टोबर २०२०रोजी त्याने त्याच्या पत्नीसोबत फोटो पोस्ट केला होता. त्याच्या हातात एक छोटीशी जर्सी होती. त्यावेळी त्याने पत्नी गरोदर असल्याचं सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2021 2:27 pm

Web Title: west indian cricketer sunil narine and wife anjellia welcome first child posts photo on instagram vjb 91
Next Stories
1 IND vs ENG : विराट, बुमराह नव्हे ‘या’ तीन खेळाडूंपासून सावध राहण्याचा इंग्लंडला सल्ला
2 IND vs ENG: भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर!! सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी, पण…
3 IND vs ENG : कसोटी मालिकेच्या निकालाबद्दल गौतमची गंभीर भविष्यवाणी, म्हणाला…
Just Now!
X