25 April 2019

News Flash

भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर

४ ऑक्टोबरपासून मालिकेला सुरुवात

सुनील अँब्रिसला वेस्ट इंडिजच्या संघात स्थान

सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला ऑक्टोबर महिन्यात घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा सामना करायचा आहे. ४ ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेला सुरुवात होणार असून, दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपला १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. अपेक्षेप्रमाणे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने जेसन होल्डरकडे संघाचं नेतृत्व दिलं आहे, मात्र डावखुऱ्या डेवॉन स्मिथला संघात जागा मिळू शकलेली नाहीये.

भारताविरुद्ध मालिकेसाठी असा असेल वेस्ट इंडिजचा संघ –

जेसन होल्डर (कर्णधार), सुनिल अँब्रिस, देवेंद्र बिशु, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस, शेन डॉव्रिच, शेनॉन गॅब्रिएल, जहामार हॅमिल्टन, शिमरॉन हेटमेयर, शाई होप, अल्झारी जोसेफ, किमो पॉल, कायरन पॉवेल, केमार रोच, जोमिएल वारिकेन

First Published on August 30, 2018 8:29 am

Web Title: west indies announce 15 member squad for two match test series against india
टॅग India,West Indies