वेस्ट इंडिज संघाच्या आगामी भारत दौऱ्यासाठी टी-२० आणि वन-डे संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. ६ डिसेंबरपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होईल. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळतील. अपेक्षेप्रमाणे कायरन पोलार्डकडे विंडीजच्या संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं असून, काही जुन्या आणि अनुभवी खेळाडूंनीही विंडीजच्या संघात पुनरागमन केलं आहे.
विंडीजचा वन-डे संघ –
कायरन पोलार्ड (कर्णधार), सुनिल अँब्रिस, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, किमो पॉल, खेरी पेरी, निकोलस पूरन, रोमारिओ शेफर्ड, हेडन वॉल्श ज्युनिअर
विंडीजचा टी-२० संघ –
कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबिअल अॅलिअन, शेल्डन कॉट्रेल, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, किमो पॉल, ब्रँडन किंग, एविन लुईस, खेरी पेरी, निकोलस पूरन, दिनेश रामदीन, शेर्फन रुदरफोर्ड, लेंडल सिमन्स, केसरिक विल्यम्स, हेडन वॉल्श ज्युनिअर
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2019 8:19 am