28 September 2020

News Flash

Ind vs WI : तिसऱ्या सामन्यात झालेले हे 14 विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

विराटच्या नावावर 13 विक्रमांची नोंद

शतकवीर विराट कोहली

पुण्याच्या गहुंजे मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात विंडीजने भारतावर 43 धावांनी मात करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. विंडीजने दिलेलं 284 धावांचं आव्हान पार करत असताना विराट कोहलीने शतकी खेळी केली, मात्र आजच्या सामन्यात भारताच्या मधल्या फळीने पुरती निराशा केली. विराटचं वन-डे मालिकेतलं हे सलग तिसरं शतक ठरलं आहे. विंडीजकडून शाई होपने पहिल्यांदा फलंदाजी करत असताना आक्रमक फटकेबाजी केली. दरम्यान भारताला पराभव पत्करावा लागला असला तरीही आजच्या सामन्यात तब्बल 14 विक्रमांची नोंद करण्यात आली, यातले 13 विक्रम हे एकट्या विराट कोहलीच्या नावावर जमा आहेत.

1 – आशिया खंडात सर्वात जलद सहा हजार धावा करणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने 117 डावांमध्ये हा विक्रम केला. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर जमा होता, सचिनने 142 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.

1 – आतापर्यंत वन-डे मालिकेत विराट 400 धावांचा टप्पा ओलांडला आहे. विंडीजविरुद्ध मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराटने आपल्या नावे केला आहे. याआधी अजिंक्य रहाणेच्या नावावर हा विक्रम जमा होता. (336 धावा)

1 – सलग 3 वन-डे सामन्यांमध्ये शतक झळकावणारा विराट पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

1 – वन-डे क्रिकेटमध्ये एका प्रतिस्पर्ध्याविरोधात सलग 4 शतकं झळकावणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे.

1 – वन-डे क्रिकेटमध्ये गेल्या 10 डावांमध्ये विराटने 995 धावा केल्या आहेत. गेल्या 10 डावांमधली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

1 – वन-डे क्रिकेटच्या इतिहासात सलग 3 शतकं झळकावणारा विराट पहिला कर्णधार ठरला आहे.

2 – विंडीजविरोधात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटने ऑस्ट्रेलियाच्या मार्क वॉला मागे टाकलं आहे. सध्या पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियादाद विराट कोहलीच्या पुढे आहेत.

3 – रिकी पाँटींग आणि कुमार संगकारा यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना वन-डे क्रिकेटमध्ये 8 हजार धावांचा टप्पा गाठणारा विराट तिसरा फलंदाज ठरला आहे.

3 – सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर भारतात वन-डे क्रिकेटमध्ये 8 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट तिसरा फलंदाज ठरला आहे.

3 – एखाद्या विशिष्ठ प्रतिस्पर्ध्याविरोधात वन-डे क्रिकेटमध्ये चौथं शतक झळकावणारा विराट तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी पाकिस्तानच्या बाबर आझम आणि एबी डिव्हीलियर्स यांनी अशी कामगिरी केली आहे.

3 – विराट कोहलीने शतक झळकावूनही भारत सामना हरण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे.

4 – वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराटने धोनीला मागे टाकलं आहे. या यादीत विराट आता चौथ्या स्थानावर आहे.

12 – आशियात 6 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विराट बारावा खेळाडू ठरला आहे.

16 – वेस्ट इंडिजच्या शेमरॉन हेटमायरने आतापर्यंत मालिकेत 16 षटकार ठोकले आहेत. भारताविरोधात एखाद्या विंडीज खेळाडूने ठोकलेले हे सर्वाधिक षटकार ठरले आहेत. हेटमायरने ख्रिस गेलचा 13 षटकारांचा विक्रम मोडीत काढला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 10:24 pm

Web Title: west indies tour of india 2018 14 records were made and created in 3rd odi virat breaks 13 records
Next Stories
1 IND vs WI : आम्ही जरा जास्तच धावा दिल्या – कोहली
2 Pro Kabaddi Season 6 : बंगाल वॉरियर्सकडून जयपूर पिंक पँथर्सचा धुव्वा
3 IND vs WI : शतकांची हॅटट्रिक करत कॅप्टन कोहलीने केला विक्रम
Just Now!
X