News Flash

IND vs WI 1st ODI HIGHLIGHTS : भारताचा विंडीजवर ८ गडी राखून विजय

India vs West indies 1st ODI Live Updates

IND vs WI 1st ODI HIGHLIGHTS : भारताचा विंडीजवर ८ गडी राखून विजय
दीडशतकवीर रोहित शर्मा आणि शतकवीर विराट कोहली

India vs West indies 1st ODI : विंडीजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारताने ८ गडी राखून जिंकला. रोहित शर्माचे दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीचे शतक(१४०) यांच्या जोरावर भारताने ३२३ धावांचे लक्ष्य सहज पार केले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम विंडीजला फलंदाजीस आमंत्रित केले. शिमरॉन हेटमायरचे झंझावाती शतक आणि कायरन पॉवेलचे अर्धशतक याच्या जोरावर विंडीजने ५० षटकात ८ बाद ३२२ धावा केल्या आणि भारतापुढे ३२३ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन ४ धावांवर बाद झाला. पण रोहित आणि विराट यांनी तडाखेबाज खेळ केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २४६ धावांची भागीदारी केली. विराट १४० धावांवर बाद झाल्यानंतरही रोहितने आपला झंझावात सुरूच ठेवला. विजयासाठी २ धावा आवश्यक असताना त्याने षटकार लगावत आपले दीडशतक (१५२*) पूर्ण केले. रायुडूने २२ धावांची उपयुक्त खेळी केली. या दोघांनी नाबाद ७० धावांची भागीदारी केली. थॉमस आणि बिशू यांनी १-१ बळी टिपला.

त्याआधी विंडीजची सुरुवात खराब झाली. चंद्रपॉल हेमराज ९ धावांवर बाद झाला. पण त्यानंतर कायरन पॉवेलने अर्धशतक ठोकले आणि डावाला आकार दिला. तो ५१ धावांवर बाद झाला. २००वा एकदिवसीय सामना खेळणारा अनुभवी सॅम्युअल्स शून्यावर बाद झाला. मात्र हेटमायरने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ७४ चेंडूत १०६ धावा केल्या. शाय होप (३२), आर पॉवेल (२१) आणि कर्णधार जेसन होल्डर (३८) हे तिघे वगळता इतर फलंदाजांना आपली छाप उमटवता आली नाही. पण शेवटच्या जोडीने मात्र भारताला रडवले. देवेंद्र बिशू (२२) आणि केमार रोच (२६) या दोघांनी नाबाद ४४ धावांची भागीदारी करून विंडीजला ३२२ या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताकडून चहलने ३, शमी व जाडेजाने २-२ आणि खलील अहमदने १ गडी टिपला.

लोकसत्ता समालोचन
Live Blog
Highlights
 • 20:45 (IST)

  'हिटमॅन'ची 'विराट' कामगिरी; भारताचा विंडीजवर दणदणीत विजय

  विंडीजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारताने ८ गडी राखून जिंकला. रोहित शर्माचे दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीचे शतक(१४०) यांच्या जोरावर भारताने ३२३ धावांचे लक्ष्य सहज पार केले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

 • 19:59 (IST)

  रोहित शर्माचा धमाका; ८४ चेंडूत ठोकले शतक

  सुरुवातीला संयमी खेळी करणाऱ्या रोहित शर्माने आपला धमाका दाखवला. १० चौकार आणि ५ षटकार लगावत रोहितने केवळ ८४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील २०वे शतक ठरले.

 • 19:40 (IST)

  कोहलीचा तडाखा; ८८ चेंडूत ठोकले शतक

  भारताचा कर्णधार विराट कोहली याने तडाखेबंद खेळी सुरु ठेवत दमदार शतक झळकावले. त्याने ८८ चेंडूत १७ चौकार आणि १ षटकार खेचला आणि शतक पूर्ण केले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३६वे शतक ठरले.

 • 17:15 (IST)

  हेटमायरचे झंझावाती शतक, भारतापुढे ३२३ धावांचे आव्हान

  भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने ५० षटकात ८ बाद ३२२ धावा केल्या. शिमरॉन हेटमायरचे झंझावाती शतक आणि कायरन पॉवेलचे अर्धशतक याच्या जोरावर विंडीजने भारतापुढे धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने ३, शमी आणि जाडेजाने २-२ तर खलील अहमदने १ गडी टिपला.

 • 14:40 (IST)

  २००व्या सामन्यात सॅम्युअल्स शून्यावर बाद, विंडीजला तिसरा धक्का

  विंडीजकडून आपला एकदिवसीय कारकिर्दीतील २००वा सामना खेळणारा मार्लन सॅम्युअल्स शून्यावर बाद झाला. युझवेन्द्र चहलने त्याला पायचीत केले. पंचांनी बाद ठरवल्यानंतर दोन फलंदाजांमध्ये काही काळ DRS बाबत चर्चा झाली पण विंडीजकडून रिव्ह्यू घेण्यात आला नाही.

 • 13:37 (IST)

  नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय, ऋषभ पंतचे पदार्पण

  भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून आजच्या सामन्यात ऋषभ पंतला संधी देण्यात आली. त्याला सामन्याआधी महेंद्रसिंग धोनी याने वन-डे कॅप दिली. हा त्याचा पदार्पणाचा सामना असल्यामुळे त्याच्या खेळाकडे आज विशेष लक्ष असणार आहे.

20:45 (IST)21 Oct 2018
'हिटमॅन'ची 'विराट' कामगिरी; भारताचा विंडीजवर दणदणीत विजय

विंडीजविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारताने ८ गडी राखून जिंकला. रोहित शर्माचे दीडशतक आणि कर्णधार विराट कोहलीचे शतक(१४०) यांच्या जोरावर भारताने ३२३ धावांचे लक्ष्य सहज पार केले. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

20:02 (IST)21 Oct 2018
‘विराट’ खेळी संपली, कोहली १४० धावांवर तंबूत

कर्णधारपदाला साजेशी खेळी करणारा विराट कोहली अखेर १४० धावांवर तंबूत परतला. १०७ चेंडूच्या आपल्या खेळीत त्याने २१ चौकार आणि २ षटकार खेचले. बिशूच्या लेगस्पिनला विराट कोहली चकला आणि यष्टिरक्षक शाय होपने त्याला यष्टिचित केले.

19:59 (IST)21 Oct 2018
रोहित शर्माचा धमाका; ८४ चेंडूत ठोकले शतक

सुरुवातीला संयमी खेळी करणाऱ्या रोहित शर्माने आपला धमाका दाखवला. १० चौकार आणि ५ षटकार लगावत रोहितने केवळ ८४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील २०वे शतक ठरले.

19:40 (IST)21 Oct 2018
कोहलीचा तडाखा; ८८ चेंडूत ठोकले शतक

भारताचा कर्णधार विराट कोहली याने तडाखेबंद खेळी सुरु ठेवत दमदार शतक झळकावले. त्याने ८८ चेंडूत १७ चौकार आणि १ षटकार खेचला आणि शतक पूर्ण केले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३६वे शतक ठरले.

19:15 (IST)21 Oct 2018
दोन उत्तुंग षटकार... रोहित शर्माचे अर्धशतक

विराट कोहली फटकेबाजी करत असल्याने सुरुवातीला संथ खेळी करणाऱ्या रोहित शर्माने आपल्या 'स्टाईल'मध्ये अर्धशतक पूर्ण केले. नर्सच्या चेंडूवर दोन उत्तुंग षटकार खेचत तो ४९ धावांवर पोहोचला. त्यानंतर पुढील षटकात १ धाव घेत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.

18:32 (IST)21 Oct 2018
कर्णधार विराट कोहलीचे ३५ चेंडूत अर्धशतक

शिखर धवन स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने मैदानावर येऊन फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने केवळ ३५ चेंडूत अर्धषशतक गाठले. या खेळीत १० चौकारांचा समावेश आहे. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४९वे अर्धशतक ठरले.

18:14 (IST)21 Oct 2018
शिखर धवन बाद, भारताला पहिला धक्का

भारताच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन ४ धावा करून तंबूत परतला. थॉमसने त्याला त्रिफळाचित केले.

17:15 (IST)21 Oct 2018
हेटमायरचे झंझावाती शतक, भारतापुढे ३२३ धावांचे आव्हान

भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने ५० षटकात ८ बाद ३२२ धावा केल्या. शिमरॉन हेटमायरचे झंझावाती शतक आणि कायरन पॉवेलचे अर्धशतक याच्या जोरावर विंडीजने भारतापुढे धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने ३, शमी आणि जाडेजाने २-२ तर खलील अहमदने १ गडी टिपला.

16:46 (IST)21 Oct 2018
कर्णधार जेसन होल्डर बाद, विंडीजला आठवा धक्का

कर्णधार जेसन होल्डर बाद, विंडीजला आठवा धक्का

16:27 (IST)21 Oct 2018
विंडीजला सातवा धक्का; अॅशले नर्स पायचीत

विंडीजला सातवा धक्का; अॅशले नर्स पायचीत

16:21 (IST)21 Oct 2018
झंझावाती शतकानंतर हेटमायर बाद; विंडीजचा सहावा गडी तंबूत

झंझावाती शतकानंतर हेटमायर बाद; विंडीजचा सहावा गडी तंबूत

16:17 (IST)21 Oct 2018
हेटमायरचा झंझावात; ७४ चेंडूत झळकावले शतक

हेटमायरचा झंझावात; ७४ चेंडूत झळकावले शतक

15:46 (IST)21 Oct 2018
रोव्हमन पॉवेल बाद; विंडीजची द्विशतकी मजल मात्र निम्मा संघ तंबूत

रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर विंडीजने आपला पाचवा गडी गमावला. जाडेजाने फेकेलेल्या आर्म बॉलवर रोव्हमन पॉवेल त्रिफळाचित झाला. त्यानंतर विंडीजने द्विशतकी मजल मारली पण त्याआधीच विंडीजचा निम्मा संघ तंबूत परतला.

15:27 (IST)21 Oct 2018
हेटमायरचे अर्धशतक, विंडीजही दीडशतकापार

विंडीजने चार गडी झटपट गमावल्यानंतर विंडीजचा आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायर याने तडाखेबाज खेळी करत अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत २ चौकार आणि ३ षटकार खेचले. यासह त्याने विंडीजचीही धावसंख्या दीडशेपार पोहोचवली.

15:05 (IST)21 Oct 2018
शाय होप झेलबाद; विंडीजचा चौथा गडी तंबूत

अनुभवी शाय होप झेलबाद झाला. मोहम्मद शमीच्या चेंडूवर बॅटला लागून चेंडू उंच उडाला. महेंद्रसिंग धोनीने अलगद तो झेल टिपत होपला तंबूत धाडले. होपने ३२ धावा केल्या.

14:40 (IST)21 Oct 2018
२००व्या सामन्यात सॅम्युअल्स शून्यावर बाद, विंडीजला तिसरा धक्का

विंडीजकडून आपला एकदिवसीय कारकिर्दीतील २००वा सामना खेळणारा मार्लन सॅम्युअल्स शून्यावर बाद झाला. युझवेन्द्र चहलने त्याला पायचीत केले. पंचांनी बाद ठरवल्यानंतर दोन फलंदाजांमध्ये काही काळ DRS बाबत चर्चा झाली पण विंडीजकडून रिव्ह्यू घेण्यात आला नाही.

14:34 (IST)21 Oct 2018
अर्धशतकानंतर पॉवेल माघारी, विंडीजचा दुसरा गडी बाद

पॉवेलने काही मोठे फटके खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर लगेचच ५१ धावांवर असताना तो बाद झाला. खलील अहमदच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळतांना शिखर धवनने झेलबाद केले.

14:28 (IST)21 Oct 2018
कायरन पॉवेलचे अर्धशतक; विंडीजची धडाकेबाज सुरुवात

भारताने पहिला बळी लवकर टिपल्यानंतर सलामीवीर कायरन पॉवेलने शाय होपच्या साथीने विंडीजचा डाव सावरला. पॉवेलने काही मोठे फटके खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने या खेळीत ६ चौकार आणि २ षटकार लगावले. आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ९वे अर्धशतक ठोकले.

13:50 (IST)21 Oct 2018
चंद्रपॉल हेमराज त्रिफळाचित, विंडीजला पहिला धक्का

विंडीजला पहिला धक्का चंद्रपॉल हेमराज याच्या रूपाने बसला. मोहम्मद शमी याने त्याचा त्रिफळा उडवला. विंडीजचा माजी खेळाडू शिवनारायण चंद्रपॉल याचा मुलगा असल्याने हेमराजकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. पण त्याला केवळ ९ धावाच करता आल्या.

13:37 (IST)21 Oct 2018
नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय, ऋषभ पंतचे पदार्पण

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून आजच्या सामन्यात ऋषभ पंतला संधी देण्यात आली. त्याला सामन्याआधी महेंद्रसिंग धोनी याने वन-डे कॅप दिली. हा त्याचा पदार्पणाचा सामना असल्यामुळे त्याच्या खेळाकडे आज विशेष लक्ष असणार आहे.

टॅग : Ind Vs WI
Next Stories
1 ‘बूँदसे गयी वो हौदसे नहीं आती’, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
2 महिलेने शरीरसुखासाठी तगादा लावल्याने परभणीत तरुणाची आत्महत्या
3 दहशतवाद हे जगासमोरचे सर्वात मोठे आव्हान-व्यंकय्या नायडू
Just Now!
X