01 March 2021

News Flash

Ind vs WI : पहिल्या दिवसावर भारताचं वर्चस्व, पृथ्वी शॉ-चेतेश्वर पुजाराने दिवस गाजवला

पृथ्वी शॉचं आक्रमक शतक

पुजारा-शॉ जोडीची द्विशतकी भागीदारी

अखेरच्या सत्रात कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ३०० धावसंख्येचा टप्पा ओलांडला आहे. पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा माघारी परतल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं. कोहली व रहाणे यांनी खेळाची गती कमी करत एक-एक धाव घेण्याकडे भर दिला. या खेळीदरम्यान कर्णधार विराट कोहलीने आपलं अर्धशतक साजरं केलं. मात्र दुसऱ्या बाजूने अजिंक्य रहाणेला ही किमया साधता आली नाही. ४१ धावांवर खेळत असताना अजिंक्य रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी संघाची फार पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात ३६४ धावांपर्यंत मजल मारली.

त्याआधी राजकोट कसोटीच्या दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केलं. चेतेश्वर पुजारा आणि पृथ्वी शॉ या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडण्यात वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना यश आलं. लुईसने पुजाराचा अडसर दूर केला तर देवेंद्र बिशुच्या गोलंदाजीवर पृथ्वी शॉ सोपा झेल देऊन माघारी परतला. पृथ्वीने १५४ चेंडूत १३४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत १९ सुरेख चौकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूने चेतेश्वर पुजारानेही ८६ धावा काढत त्याला चांगली साथ दिली.

दरम्यान मुंबईच्या पृथ्वी शॉने पहिल्याच कसोटी सामन्यात आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत असताना पृथ्वी शॉने शतक झळकावलं आहे. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ भारताचा पंधरावा खेळाडू ठरला आहे. पृथ्वीने चेतेश्वर पुजाराच्या साथीने शतकी भागीदारी रचत वेस्ट इंडिजला सामन्यात बॅकफूटला ढकललं.  याचसोबत दुसऱ्या विकेटसाठी पुजाराने शॉच्या साथीने द्विशतकी भागीदारीही केली.

त्याआधी, दोन्ही फलंदाजांनी केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीच्या पहिल्या सत्रावर आपलं वर्चस्व राखलं . पहिल्या सत्राअखेरीस भारताने एका गड्याच्या मोबदल्यात १३३ धावांपर्यंत मजल मारली . सलामीवीर पृथ्वी शॉने पदार्पणाच्या कसोटीत झळकावलेलं अर्धशतक हे पहिल्या सत्राततल्या खेळाचं वैशिष्ट्य ठरलं.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

 • 12:47 (IST)

  पृथ्वी शॉचं शतक

  सलामीच्या सामन्यात शतक झळकावत पृथ्वी सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी पंधरावा खेळाडू ठरला आहे.

 • 11:04 (IST)

  पृथ्वी शॉचं अर्धशतक

  लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर पृथ्वी शॉने चेतेश्वर पुजाराच्या साथीने किल्ला लढवत संघाचा डाव सावरला. यादरम्यान पृथ्वी शॉने सलामीच्या सामन्यात अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.

 • 09:39 (IST)

  भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल माघारी

  शेनॉन गॅब्रिएलच्या गोलंदाजीवर आत येणाऱ्या चेंडूवर लोकेश राहुल फसला. लोकेश राहुल माघारी, भारताला पहिला धक्का

17:16 (IST)04 Oct 2018
पहिल्या दिवसाचा खेळ संपला

दिवसाअखेरीस भारत ३६४/४

17:16 (IST)04 Oct 2018
पहिल्या दिवसाचा खेळ संपला

दिवसाअखेरीस भारत ३६४/४

17:16 (IST)04 Oct 2018
पहिल्या दिवसाचा खेळ संपला

दिवसाअखेरीस भारत ३६४/४

16:40 (IST)04 Oct 2018
भारताला चौथा धक्का, अजिंक्य रहाणे माघारी

रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणे माघारी, भारताला चौथा धक्का

16:19 (IST)04 Oct 2018
विराट कोहलीचं अर्धशतक

कोहलीने रहाणेच्या साथीने संघाचा किल्ला लढवत अर्धशतक झळकावलं

16:01 (IST)04 Oct 2018
कोहली - रहाणेची अर्धशतकी भागीदारी, भारताचं सामन्यावर वर्चस्व

चौथ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांमध्ये झालेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारताने ओलांडला ३०० धावांचा टप्पा

14:18 (IST)04 Oct 2018
चहापानाच्या सत्राची घोषणा, भारत २३२/३

आतापर्यंत भारतीय फलंदाजांची कामगिरी पुढीलप्रमाणे - 

लोकेश राहुल - ०, पृथ्वी शॉ - १३४, चेतेश्वर पुजारा - ८६ 

विराट कोहली - नाबाद ४, अजिंक्य रहाणे - नाबाद ०

14:16 (IST)04 Oct 2018
भारताला तिसरा धक्का, पृथ्वी शॉ माघारी

देवेंद्र बिशुच्या गोलंदाजीवर शॉ माघारी, भारताला तिसरा धक्का. शॉच्या १३४ धावा

13:42 (IST)04 Oct 2018
भारताची जमलेली जोडी फुटली, चेतेश्वर पुजारा माघारी

लुईसच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक डावरिचकडे झेल देत पुजारा माघारी. पुजाराची ८६ धावांची खेळी

13:42 (IST)04 Oct 2018
पृथ्वी - चेतेश्वर पुजारामध्ये द्विशतकी भागीदारी, भारताचं सामन्यावर वर्चस्व

दोन्ही फलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी २०६ धावांची भागीदारी

12:47 (IST)04 Oct 2018
पृथ्वी शॉचं शतक

सलामीच्या सामन्यात शतक झळकावत पृथ्वी सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी पंधरावा खेळाडू ठरला आहे.

11:46 (IST)04 Oct 2018
पहिल्या सत्रावर भारताची पकड, उपहारापर्यंत भारत १३३/१

उपहारापर्यंत पृथ्वी शॉ - नाबाद ७५, चेतेश्वर पुजारा - नाबाद ५६

11:45 (IST)04 Oct 2018
पृथ्वी पाठोपाठ पुजाराचंही अर्धशतक

चेतेश्वर पुजारानेही दुसऱ्या बाजूने आपलं अर्धशतक साजरं केलं

11:44 (IST)04 Oct 2018
दुसऱ्या विकेटसाठी पृथ्वी-पुजाराची शतकी भागीदारी

भारताच्या दोन्ही खेळाडूंनी खेळपट्टीवर आपला जम बसवत, सामन्यावर आपलं नियंत्रण मिळवलं आहे. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत पहिल्या सत्रात विंडिजला बॅकफूटवर ढकललं आहे.

11:04 (IST)04 Oct 2018
पृथ्वी शॉचं अर्धशतक

लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर पृथ्वी शॉने चेतेश्वर पुजाराच्या साथीने किल्ला लढवत संघाचा डाव सावरला. यादरम्यान पृथ्वी शॉने सलामीच्या सामन्यात अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.

10:32 (IST)04 Oct 2018
पृथ्वी शॉ - चेतेश्वर पुजाराची अर्धशतकी भागीदारी, भारताचा डाव सावरला

लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी सावध पवित्रा घेत अर्धशतकी भागीदारी रचली. या भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला असून भारताने ५० धावसंख्येचा टप्पा ओलांडला आहे

09:39 (IST)04 Oct 2018
भारताला पहिला धक्का, लोकेश राहुल माघारी

शेनॉन गॅब्रिएलच्या गोलंदाजीवर आत येणाऱ्या चेंडूवर लोकेश राहुल फसला. लोकेश राहुल माघारी, भारताला पहिला धक्का

09:20 (IST)04 Oct 2018
भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

कर्णधार विराट कोहलीचा नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय, मुंबईकर पृथ्वी शॉ भारताकडून पदार्पण करणार

टॅग : Ind Vs WI
Next Stories
1 इम्रान ताहीरची हॅटट्रीक, दक्षिण आफ्रिकेची झिम्बाब्वेवर मात
2 राजकोटवर राज्य कुणाचे?
3 निर्णयप्रक्रिया एका व्यक्तीच्या दृष्टिकोनातून चालत नाही – कोहली
Just Now!
X