News Flash

IND vs WI : भारताची ‘होप’लेस कामगिरी; विंडीजने बरोबरीत सोडवला सामना

India vs West Indies 2nd ODI - शाय होपचे शतक, कर्णधार विराट कोहली सामनावीर

शतकवीर शाय होप

IND vs WI : भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने भारताला बरोबरीत रोखले. शाय होपचे झुंजार शतक आणि हेटमायरची तडाखेबाज ९४ धावांची खेळी याच्या बळावर विंडीजने हा सामना बरोबरीत सोडवला. भारताने दिलेल्या ३२२ धावांचे आव्हान विंडीज पूर्ण करू शकले नाही, पण ३२१ धावा करत हा सामना बरोबरीत सोडवण्यात विंडीजला यश आले. या सामन्यातील बरोबरीमुळे भारत पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ३२१ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीचे नाबाद दीडशतक (१५७*) आणि अंबाती रायडूच्या ७३ धावांच्या बळावर भारताने ही धावसंख्या उभारली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शिखर धवन (२९) आणि रोहित शर्मा (४) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर विराट आणि रायडू यांनी डाव सावरला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३९ धावांची भागीदारी केली. पण रायडू फटकेबाजी करताना ७३ धावांवर बाद झाला. त्याने ८ चौकार लगावले. त्यानंतर धोनी (२०), पंत (१७) आणि जाडेजा (१३) हे तिघे फार काळ तग धरू शकले नाहीत. पण सर्व खेळाडूंबरोबर छोट्या छोट्या भागीदारी करून कोहलीने भारताला ३२१ धावांपर्यंत पोहचवले. विंडीजकडून नर्स आणि मॅकॉयने २-२ तर रोच आणि सॅम्युअल्सने १-१ गडी बाद केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाली. पण हेटमायरने जोरदार फटकेबाजी करत विंडीजच्या आशा पल्लवित केल्या. त्याने ९४ धावा केल्या. पण शतक लागण्याआधीच तो ९४ धावांवर बाद झाला. त्यानंतर विंडीजच्या विजयाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत शाय होपने अप्रतिम खेळी केली. या सामन्यात त्याने झुंजार शतक ठोकले. शतक ठोकल्यानंतही त्याने आपला खेळ योग्य पद्धतीने सुरूच ठेवला आणि विंडीजला पराभवाच्या छायेतून वाचवले. मात्र शेवटच्या चेंडूवर ५ धावा असताना त्याला षटकार लगावता आला नाही. पण चौकार लगावत त्याने भारताच्या ३२१ धावांच्या कामगिरीशी बरोबरी साधली. होपने १३४ चेंडूत १२३ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने ३ तर शमी, उमेश यादव आणि चहल यांनी १-१ गडी बाद केला.

लोकसत्ता समालोचन
Live Blog
Highlights
 • 20:15 (IST)

  हेटमायरचे शतक हुकले, ९४ धावांवर तंबूत

  तडाखेबाज खेळी करणारा शिमरॉन हेटमायर याला शतकाने थोडक्यात हुलकावणी दिली. पहिल्या सामन्यात तो शतकानंतर ६ धावा करून बाद झाला होता. तर आजच्या सामन्यात त्याला शतकासाठी ६ धावा कमी पडल्या. ६४ चेंडूत ९४ धावा करून तो चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार कोहलीने त्याचा झेल टिपला.

 • 17:25 (IST)

  कॅप्टन कोहलीचे दीडशतक; विंडीजपुढे ३२२ धावांचे आव्हान

  गेल्या सामन्यात १४० धावांवर बाद झालेल्या कर्णधार कोहलीने या सामन्यात दीडशतक पूर्ण केले. १२७ चेंडूत त्याने हा पराक्रम केला. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ३ षटकार लगावले. या बरोबर भारताने ५० षटकात ३२१ धावा केल्या. विंडीजपुढे विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान आहे.

 • 13:13 (IST)

  भारताने नाणेफेक जिंकली

  दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गेल्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करून भारताने ३००हून अधिक धावा खर्चील्या होत्या. त्यामुळे या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत किती धावा करतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

21:42 (IST)24 Oct 2018
अॅश्ले नर्स बाद; विंडीजचा पाय खोलात

दबावाच्या स्थितीत अॅश्ले नर्स धावबाद झाला आणि विंडीजचा पाय आणखी खोलात गेला. आता विंडिजला २ चेंडूत ७ धावांची गरज आहे.

21:27 (IST)24 Oct 2018
कर्णधार होल्डर बाद; विंडीजचा सहावा गडी तंबूत

शतकवीर शाय होप नाबाद असला तरी कर्णधार होल्डर बाद झाला आणि विंडीजने आपला सहावा गडी गमावला.

21:13 (IST)24 Oct 2018
शाय होपचे झुंजार शतक; विंडीजच्या आशा अद्यापही जिवंत

हेटमायरचे शतक हुकले असले तरी शाय होपने आपला खेळ सुरूच ठेवला आणि झुंजार शतक झळकावले. या शतकात त्याने चौकार आणि षटकारांची बरसात केली.

20:47 (IST)24 Oct 2018
रॉवमन पॉवेल बाद, विंडीजचा पाचवा गडी माघारी

शाय होप पॉवेलच्या साथीने विंडीजला आव्हानासमीप नेण्याचा प्रयत्न केला होता. पण पॉवेलला कुलदीप यादवने टाकलेल्या चेंडूची फिरत न समजल्यामुळे त्याने स्लिपमध्ये झेल दिला. त्याने १८ चेंडूत १८ धावा केल्या.

20:15 (IST)24 Oct 2018
हेटमायरचे शतक हुकले, ९४ धावांवर तंबूत

तडाखेबाज खेळी करणारा शिमरॉन हेटमायर याला शतकाने थोडक्यात हुलकावणी दिली. पहिल्या सामन्यात तो शतकानंतर ६ धावा करून बाद झाला होता. तर आजच्या सामन्यात त्याला शतकासाठी ६ धावा कमी पडल्या. ६४ चेंडूत ९४ धावा करून तो चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार कोहलीने त्याचा झेल टिपला.

20:02 (IST)24 Oct 2018
शाय होपचे अर्धशतक, हेटमायर शतकानजीक

शाय होपचे अर्धशतक, हेटमायर शतकानजीक

19:32 (IST)24 Oct 2018
हेटमायरचे तडाखेबाज अर्धशतक; विंडीजच्या आशा जिवंत

पहिल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या शिमरॉन हेटमायर याने या सामन्यातही अर्धशतक झळकावले. त्याने तब्बल ४ षटकार आणि १ चौकार फाटकावत भारताच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.

18:51 (IST)24 Oct 2018
अनुभवी मार्लन सॅम्युअल्स माघारी

गेल्या सामन्यात शून्यावर बाद होणारा विंडीजचा सर्वात अनुभवी खेळाडू मार्लन सॅम्युअल्स या सामन्यातही १३ धावांवर बाद झाला. खेळीची सुरुवात त्याने उत्तम केली होती. १० चेंडूत त्याने ३ चौकार लगावले पण लगेचच तो बाद झाला.

18:38 (IST)24 Oct 2018
चंद्रपॉल हेमराज त्रिफळाचित, विंडीजला दुसरा धक्का

सलामीवीर चंद्रपॉल हेमराज हा सलग दुसऱ्या सामन्यात आपली छाप उडवण्यात अपयशी ठरला. २४ चेंडूत त्याने ३२ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने ६ चौकार खेचले.

18:21 (IST)24 Oct 2018
कायरन पॉवेल झेलबाद; विंडीजचा पहिला गडी माघारी

विंडीजचा सलामीवीर कायरन पॉवेल हा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. मोहम्मद शमीने टाकलेल्या चेंडूवर ऋषभ पंतने सीमारेषेवर त्याचा सोपा झेल टिपला.

17:25 (IST)24 Oct 2018
कॅप्टन कोहलीचे दीडशतक; विंडीजपुढे ३२२ धावांचे आव्हान

गेल्या सामन्यात १४० धावांवर बाद झालेल्या कर्णधार कोहलीने या सामन्यात दीडशतक पूर्ण केले. १२७ चेंडूत त्याने हा पराक्रम केला. या खेळीत त्याने १३ चौकार आणि ३ षटकार लगावले. या बरोबर भारताने ५० षटकात ३२१ धावा केल्या. विंडीजपुढे विजयासाठी ३२२ धावांचे आव्हान आहे.

17:16 (IST)24 Oct 2018
रवींद्र जाडेजा बाद; भारताला सहावा धक्का

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा मोठी खेळी करू शकला नाही. तो १३ धावा करून तंबूत परतला. मॅकॉयच्या गोलंदाजीवर पॉवेलने त्याचा झेल टिपला.

17:04 (IST)24 Oct 2018
२०१८ वर्षात कोहलीच्या १००० एकदिवसीय धावा पूर्ण

२०१८ वर्षात कोहलीच्या १००० एकदिवसीय धावा पूर्ण

16:52 (IST)24 Oct 2018
कर्णधार कोहलीचे शतक; भारत २५० पार

कर्णधार कोहलीने पहिल्या सामन्यातील लय कायम राखत दुसऱ्या सामन्यतही शतक ठोकले. हे त्याचे कारकिर्दीतील ३७वे शतक ठरले. या शतकी खेळीत त्याने १० चौकार लगावले.

16:47 (IST)24 Oct 2018
ऋषभ पंत पायचीत; भारताचा निम्मा संघ बाद

फटकेबाजी करणारा ऋषभ पंत अत्यंत कमी उंचीवर असलेल्या चेंडूवर पायचीत झाला. मार्लन सॅम्युअल्सच्या गोलंदाजीवर तो फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने १३ चेंडूत २ चौकारांसह १७ धावा केल्या.

16:39 (IST)24 Oct 2018
धोनी २० धावांवर बाद; भारताचा चौथा गडी माघारी

अनुभवी महेंद्रसिंग धोनी मॅकॉयच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने केवळ २० धावा केल्या. भारताकडून एकदिवसीय सामन्यांमध्ये १० हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला ५१ धावा आवश्यक होत्या. पण तो २० धावा करून तंबूत परतला.

15:57 (IST)24 Oct 2018
भारताला तिसरा धक्का, रायडू त्रिफळाचित

कोहलीपाठोपाठ आपले अर्धशतक पूर्ण करणारा अंबाती रायडू हा ७३ धावांवर बाद झाला. नर्सच्या फिरकीवर आडवा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. रायडूने आपल्या ७३ धावांच्या खेळीत ८ चौकार लगावले.

15:24 (IST)24 Oct 2018
कोहलीपाठोपाठ रायडूचेही अर्धशतक

कोहलीने अर्धशतक झळकावल्यानंतर पाठोपाठ अंबाती रायडूनही आपले अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या सामन्यात तो नाबाद राहिला होता. त्या सामन्यातही त्याने चांगली फटकेबाजी केली होती. आता सुरु असलेल्या सामन्यात त्याने चौकारांची बरसात करत अर्धशतक केले.

15:17 (IST)24 Oct 2018
जीवदान मिळाल्यानंतर कोहलीचे दमदार अर्धशतक

पहिल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्या आधी ४४ धावांवर असताना मॅकॉय या गोलंदाजाच्या चेंडूवर कर्णधार विराट कोहली खेळत होता. त्याने टाकलेल्या चेंडूवर कोहलीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू उंच उडाला पण होल्डरला तो चेंडू झेलता आला नाही.

14:10 (IST)24 Oct 2018
भारताला दुसरा झटका; सलामीवीर धवन तंबूत

पहिल्या सामन्यात खराब कामगिरी करणाऱ्या शिखर धवनला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. पण फिरकीपटू नर्सच्या गोलंदाजीवर बचावात्मक फटका खेळताना तो पायचीत झाला. त्याने ३० चेंडूत २९ धावा केल्या. यात त्याने ४ चौकार आणि १ षटकार खेचला.

13:45 (IST)24 Oct 2018
रोहित शर्मा बाद, भारताला पहिला धक्का

पहिल्या सामन्यात नाबाद दीडशतकी (१५२) खेळी करणारा रोहित शर्मा केवळ ४ धावा करून बाद झाला. केमार रोचच्या गोलंदाजीवर त्याच्या झेल टिपण्यात आला. रोहितने आपल्या खेळीत १ चौकार ठोकला.

13:15 (IST)24 Oct 2018
कुलदीप यादवला संधी

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ तीन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरला आहे. खलील अहमद ऐवजी कुलदीप यादवला अंतिम ११ मध्ये स्थान देण्यात आले आहे. 

13:13 (IST)24 Oct 2018
भारताने नाणेफेक जिंकली

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. गेल्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करून भारताने ३००हून अधिक धावा खर्चील्या होत्या. त्यामुळे या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत किती धावा करतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

Next Stories
1 Ind vs WI : विराट कोहली आज करणार मोठा विक्रम?
2 भारताचे पारडे जड
3 अजित पवार यांना राष्ट्रीय कबड्डी संघटनेचे वेध!
Just Now!
X