07 April 2020

News Flash

IND vs WI : रोहितचा झंझावात, भारताचा मालिका विजय

India vs West indies 2nd T20 - विंडीजचा ७१ धावांनी पराभव

India vs West indies 2nd T20 Live Updates : विंडीजविरुद्धचा दुसरा टी२० सामना भारताने ७१ धावांनी जिंकला आणि मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाबाद १११ धावा करून भारताला १९५ धावांपर्यंत मजल मारून दिली. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची दाणादाण उडाली. डॅरेन ब्राव्होने सर्वाधिक २३ धावा केल्या. विंडीजचा संघ केवळ १२४ धावा करू शकला. विंडीजचे इतर फलंदाज चमक दाखवण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरले. रोहितला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

त्याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद झंझावाती शतकाच्या (१११*) बळावर भारताने विंडीजपुढे १९६ धावांचे मोठे आव्हान ठेवले. नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. रोहित आणि शिखरने जोरदार फलंदाजी करत भारताला १२३ दहावीची भक्कम सलामी दिली. पण शिखर ४३ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ फलंदाजीत बढती मिळालेला पंत ५ धावांवर तंबूत परतला. राहुलने १४ चेंडूत नाबाद २६ धावांची खेळी करून रोहितला साथ दिली.

१९६ धावांचा पाठलाग करताना विंडीजला केवळ ९ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारता आली. होप (६), हेटमायर (१५), डॅरेन ब्राव्हो (२३), दिनेश रामदिन (१०), पूरन (१०) आणि पोलार्ड (६) या महत्वाच्या फलंदाजांनी विंडीजची पूर्ण निराशा केली. तळाच्या फलंदाजांपैकी कर्णधार ब्रेथवेट (१५*) आणि किमो पॉल (२०) यांनी थोडी झुंज दिली. पण अखेर भारताने सामना ७१ धावांनी जिंकला.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

  • 20:36 (IST)

    कर्णधार रोहितचे झंझावाती शतक, विंडीजपुढे १९६ धावांचे आव्हान

    भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद झंझावाती शतकाच्या (१११*) बळावर भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात विंडीजपुढे १९६ धावांचे मोठे आव्हान ठेवले.  राहुलने १४ चेंडूत नाबाद २६ धावांची खेळी करून रोहितला साथ दिली.

  • 18:39 (IST)

    नाणेफेक जिंकून विंडीजची प्रथम गोलंदाजी, उमेशच्या जागी भुवनेश्वर संघात

    नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने गोलंदाजी स्वीकारली. भारताच्या संघात उमेश यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे. बाकी संघात बदल नाही.

22:19 (IST)06 Nov 2018
किमो पॉल झेलबाद, विंडीजचा आठवा गडी माघारी

फटकेबाजी करणारा किमो पॉल झेलबाद झाला. त्याला भुवनेश्वर कुमारने बाद केले. त्याने २० धावा केल्या आणि विंडीजचा आठवा गडी माघारी परतला.

21:53 (IST)06 Nov 2018
अनुभवी रामदीनपाठोपाठ अॅलन माघारी, विंडीजने सात गडी बाद

विंडीजचा अनुभवी खेळाडू दिनेश रामदीन झेलबाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर अॅलन माघारी परतला. कृणाल पांड्याने त्याला धावचीत केले आणि विंडीजचा सात गडी माघारी पाठवला.

21:39 (IST)06 Nov 2018
कायरन पोलार्ड बाद, विंडीजचा निम्मा संघ तंबूत

धोकादायक कायरन पोलार्ड तंबूत परतला. बुमराहने स्वतःच्या गोलंदाजीवर त्याचा झेल टिपला. पोलार्डने केवळ ६ धावा केल्या.

21:28 (IST)06 Nov 2018
ब्राव्होपाठोपाठ निकोलस पूरन बाद, विंडीजचे ४ गडी बाद

ब्राव्होपाठोपाठ निकोलस पूरन बाद, विंडीजचे ४ गडी बाद

21:16 (IST)06 Nov 2018
सलामीवीर हेटमायर बाद, खलीलचा दुसरा बळी

विंडीजचा दुसरा सलामीवीर हेटमायरदेखील बाद झाला. खलीलने त्याला झेलबाद करत दुसरा बळी टिपला आणि विंडीजला दुसरा दणका दिला. हेटमायरने १४ चेंडूत १५ धावा केल्या.

20:54 (IST)06 Nov 2018
विंडीजला पहिला धक्का, खलीलने उडवला होपचा त्रिफळा

भुवनेश्वर कुमारला सरळ षटकार लगावत आपल्या धावांचे खाते उघडणारा विंडीजचा शे होप ६ धावांवर बाद झाला आणि विंडीजला पहिला धक्का बसला. नवोदित खलील अहमदने होपचा त्रिफळा उडवला.

20:36 (IST)06 Nov 2018
कर्णधार रोहितचे झंझावाती शतक, विंडीजपुढे १९६ धावांचे आव्हान

भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नाबाद झंझावाती शतकाच्या (१११*) बळावर भारताने दुसऱ्या टी२० सामन्यात विंडीजपुढे १९६ धावांचे मोठे आव्हान ठेवले.  राहुलने १४ चेंडूत नाबाद २६ धावांची खेळी करून रोहितला साथ दिली.

20:34 (IST)06 Nov 2018
कर्णधार रोहित शर्माचे ५८ चेंडूत शतक

कर्णधार रोहित शर्माने तुफानी खेळी करत ५८ चेंडूत शतक झळकावले. शकहर धवन आणि ऋषभ पंत हे दोन खेळाडू बाद झाले, पण रोहितने आपल्या खेळीत संथपणा येऊ न देता आपले शतक पूर्ण केले.

20:15 (IST)06 Nov 2018
ऋषभ पंत ५ धावांवर माघारी; भारताला दुसरा धक्का

फलंदाजीच्या क्रमात ऋषभ पंत याला बढती मिळावी. पण त्या संधीचे त्याला सोने करता आले नाही. तो केवळ ५ धावांवर माघारी परतला आणि भारताला दुसरा धक्का बसला. पिअरने त्याला बाद केले.

20:09 (IST)06 Nov 2018
शिखरला अर्धशतकाने दिली हुलकावणी; भारताला पहिला धक्का

सलामीवीर शिखर धवन चांगली खेळी करत होता, मात्र त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्यामुळे भारताला पहिला धक्का बसला. शिखरने ४१ चेंडूत ४३ धावा केल्या.

20:05 (IST)06 Nov 2018
रोहित शर्माचे झंझावाती अर्धशतक, भारताचे शतक

रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत झंझावाती अर्धशतक ठोकले. त्याच्या अर्धशतकाबरोबरच भारतीय संघानेही शतकाचा टप्पा गाठला. महत्वाचे म्हणजे भारताने एकही गडी न गमावता शतकी धावसंख्या गाठली आहे.

18:39 (IST)06 Nov 2018
नाणेफेक जिंकून विंडीजची प्रथम गोलंदाजी, उमेशच्या जागी भुवनेश्वर संघात

नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट याने गोलंदाजी स्वीकारली. भारताच्या संघात उमेश यादवच्या जागी भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे. बाकी संघात बदल नाही.

<p class="appstext"><img src="https://images.loksatta.com/2020/03/telegram-26-03-2020.png" width="24" height="24" style="margin-right:0;"><strong><em>लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल <a onclick="ga( "send", "event", "Telegram_Click", "click", "https://t.me/LoksattaLiveOfficial" );" href="https://t.me/LoksattaLiveOfficial" target="_blank"> (@Loksatta) </a> जॉइन करण्यासाठी <a href="https://t.me/LoksattaLiveOfficial" target="_blank" onclick="ga( "send", "event", "Telegram_Click", "click", "https://t.me/LoksattaLiveOfficial" );"> येथे क्लिक करा </a> आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.</em></strong></p>

First Published on November 6, 2018 6:30 pm

Web Title: west indies tour of india 2018 2nd t20 lucknow live updates online
Next Stories
1 निवृत्तीच्या सामन्यात फिरकीपटू रंगना हेराथने रचला इतिहास
2 गहुंजे मैदानावर बँक ऑफ महाराष्ट्रचा प्रतिकात्मक ताबा, कर्जाचे हप्ते थकले
3 प्रशिक्षक मिकी आर्थर गाढव, पाक क्रिकेट प्रशासकीय समिती प्रमुखांचं वादग्रस्त वक्तव्य
Just Now!
X