16 February 2019

News Flash

IND vs WI 2nd Test HIGHLIGHTS : पहिल्या दिवसअखेर विंडीज ७ बाद २९५

West Indies Tour of India 2018 2nd Test Hyderabad Day 1 Live Updates

India vs West Indies 2nd test

IND vs WI : हैदराबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली असून पहिल्या दिवसअखेर विंडिजने ७ बाद २९५ धावा केल्या. नाणेफेक जिंकून विंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सत्रात विंडीजने ३ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट आणि कायरन पॉवेल या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पण नंतर दोघेही झटपट बाद झाले. पॉवेल २२ तर ब्रेथवेट १४ धावांवर तंबूत परतला. पॉवेलला अश्विनने झेलबाद केले तर ब्रेथवेटला कुलदीप यादवने अप्रतिम फिरकी टाकून जाळ्यात अडकवले. त्यानंतर काही काळ संयमी खेळी करून शाय होपही माघारी परतला. उमेश यादवने त्याला पायचीत केले.

दुसऱ्या सत्रात हेटमेयर १२ धावांवर आणि अम्बरीस १८ धावांवर झटपट बाद झाले. या दोघांना कुलदीप यादवने बाद केले. त्यानंतर डावरीचने काही काळ संघर्ष केला, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो ३० धावा करून बाद झाला. त्याला उमेश यादवने पायचीत केले.

तिसऱ्या सत्रात मात्र विंडीजच्या होल्डर – चेस जोडीने भारताच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. या दोघांनी शतकी (१०४) भागीदारी केली. अर्धशतकी खेळी केल्यानंतर कर्णधार जेसन होल्डर ५२ धावांवर बाद झाला. उमेश यादवने त्याला तंबूत धाडले. पण चेसने एका बाजूने किल्ला लढवला. सध्या चेस शतकापासून २ धावा दूर आहे. तर देवेंद्र बिशू २ धावांवर खेळत आहे.

या सामन्यात मुंबईकर शार्दूल ठाकूरला अंतिम संघात स्थान मिळाले आहे. मोहम्मद शमीला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. विजय मिळवून निर्भेळ यश संपादन करण्याचे विराटसेनेचे लक्ष्य आहे. पहिल्या लढतीत भारताने कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवताना विंडीजला एक डाव व २७२ धावांनी नेस्तनाबूत केले. त्यामुळे आत्मविश्वास खालावलेल्या विंडीजवर आणखी एक आघात करून एकदिवसीय मालिकेपूर्वी जोमाने सराव करण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे.

२०११ च्या दौऱ्यात भारताने विंडीजला २-० असे नमवले होते, तर २०१३ मध्ये त्यांनी दोन्ही कसोटी सामने तीन दिवसांच्या आतच संपवून विजयास गवसणी घातली होती. यंदाही भारताला ही सुवर्णसंधी आहे.

लोकसत्ता समालोचन

West Indies in India, 2 Test Series, 2018Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad 16 February 2019

India  367 (106.4) & 75/0 (16.1)

vs

West Indies  311 (101.4) & 127 (46.1)

Match Ended ( Day 3 - 2nd Test ) India beat West Indies by 10 wickets

Live Blog

Highlights

 • 14:14 (IST)

  विंडीजची द्विशतकाकडे वाटचाल; चहापानापर्यंत ६ बाद १९७

  सामन्यात दुसऱ्या सत्राचा खेळ संपेपर्यंत विंडीजने ६ बाद १९७ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या सत्रात डावरीचने काही काळ संघर्ष केला, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो ३० धावा करून बाद झाला. त्याला उमेश यादवने पायचीत केले. कुलदीप यादवनेही दोन गडी बाद केले.

 • 11:32 (IST)

  शाय होप बाद; उपहारापर्यंत विंडीज ३ बाद ८६

  विंडीजचा अनुभवी खेळाडू शाय होप बाद झाला. उमेश यादवने त्याला पायचीत केले. या विकेटनंतर उपहाराची विश्रांती घेण्यात आली. त्यामुळे आता उपहारापर्यंत विंडीजची धावसंख्या ३ बाद ८६ अशी आहे.

 • 09:15 (IST)

  नाणेफेक जिंकून विंडिजची प्रथम फलंदाजी; मुंबईकर शार्दूल ठाकूरला अंतिम संघात स्थान

  नाणेफेक जिंकून विंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबईकर शार्दूल ठाकूरला अंतिम संघात स्थान मिळाले आहे. मोहम्मद शमीला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.

16:32 (IST) 12 Oct 2018
पडझडीनंतर विंडीजची झुंज; पहिल्या दिवसअखेर ७ बाद २९५

पडझडीनंतर विंडीजची झुंज; पहिल्या दिवसअखेर ७ बाद २९५

16:12 (IST) 12 Oct 2018
अर्धशतकानंतर कर्णधार होल्डर बाद; विंडीजला सातवा धक्का

कर्णधारपदाला साजेशी खेळी करणाऱ्या होल्डरला अर्धशतक केल्यावर लगेच तंबूची वाट धरावी लागली. त्याने ९२ चेंडूत ५२ धावांची संयमी खेळी केली.या खेळीत त्याने ६ चौकार लगावले. रॉस्टन चेस बरोबर त्याने १०४ धावांची भागीदारी केली.

16:04 (IST) 12 Oct 2018
कर्णधार जेसन होल्डरचे झुंजार अर्धशतक; चेस शतकानजीक

सहा गडी झटपट गमावल्यानंतर कर्णधार जेसन होल्डर आणि रॉस्टन चेस यांनी उत्तम फलंदाजी केली. या दोघांनी विंडीजचा डाव सावरला. कर्णधार होल्डरने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आणि आपले अर्धशतक पूर्ण केले.

14:14 (IST) 12 Oct 2018
विंडीजची द्विशतकाकडे वाटचाल; चहापानापर्यंत ६ बाद १९७

सामन्यात दुसऱ्या सत्राचा खेळ संपेपर्यंत विंडीजने ६ बाद १९७ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या सत्रात डावरीचने काही काळ संघर्ष केला, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तो ३० धावा करून बाद झाला. त्याला उमेश यादवने पायचीत केले. कुलदीप यादवनेही दोन गडी बाद केले.

13:53 (IST) 12 Oct 2018
शेन डावरीच पायचीत; विंडीजला सहावा धक्का

विंडीजला सहावा धक्का शेन डावरीचच्या रूपाने बसला. उमेश यादवच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. पंचांनी त्याला बाद दिले नव्हते. या निर्णयाला डीआरएसने आव्हान देण्यात आले आणि रिव्ह्यूमध्ये त्याला बाद ठरवण्यात आले.

13:26 (IST) 12 Oct 2018
५ गड्यांच्या मोबदल्यात विंडीजची दीडशतकी मजल

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजने १५० धावांचा टप्पा गाठला. पण त्यासाठी त्यांना ५ गडी गमवावे लागले. आता मोठी धावसंख्या उभारण्यासाठी विंडीजची मदार मधल्या फळीच्या आणि तळाच्या फलंदाजांवर आहे.

12:44 (IST) 12 Oct 2018
अम्बरीस झेलबाद; विंडीजचा निम्मा संघ तंबूत

कुलदीपच्या फिरकीची जादू चालत असून विंडीजचा निम्मा संघ तंबूत परतला आहे. सुनील अम्बरीस १८ धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने त्याला झेलबाद होण्यास भाग पाडले. या बरोबर कुलदीपने डावातील तिसरा बळी टिपला.

12:24 (IST) 12 Oct 2018
विंडीजचा चौथा गडी तंबूत; हेटमेयर १२ धावा करून माघारी

उपहारानंतर लगेचच विंडीजने चौथा गडी गमावला. हेटमेयर केवळ १२ धावा करून तंबूत परतला. कुलदीप यादवने त्याला बाद करत दुसरा बळी मिळवला.

11:32 (IST) 12 Oct 2018
शाय होप बाद; उपहारापर्यंत विंडीज ३ बाद ८६

विंडीजचा अनुभवी खेळाडू शाय होप बाद झाला. उमेश यादवने त्याला पायचीत केले. या विकेटनंतर उपहाराची विश्रांती घेण्यात आली. त्यामुळे आता उपहारापर्यंत विंडीजची धावसंख्या ३ बाद ८६ अशी आहे.

10:56 (IST) 12 Oct 2018
विंडीजचा दुसरा गडी माघारी, ब्रेथवेट १४ धावांवर बाद

विंडीजच्या संघाला दुसरा धक्का बसला. सलामीवीर क्रेग ब्रेथवेट हा संयमी खेळी खेळत असताना पायचीत झाला. कुलदीप यादव याच्या गोलंदाजीवर तो १५४ धावा करून बाद झाला.

10:19 (IST) 12 Oct 2018
विंडीजचा पहिला गडी बाद, कायरन पॉवेल २२ धावांवर तंबूत

नाणेफेक जिंकून विंडीजच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. परंतु अर्धशतकी सलामी देण्यात त्यांना अपयश आले. विंडीजचा पहिला गडी ३७ धावांवर बाद झाला. सलामीवीर कायरन पॉवेल २२ धावांवर तंबूत परतला.

10:04 (IST) 12 Oct 2018
दुसऱ्याच षटकात शार्दूल ठाकूर दुखापतग्रस्त; उपचारासाठी तंबूत

कसोटी पदार्पणाच्या दुसऱ्याच षटकात मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर हा पायात क्रॅम्प आल्याने दुखापतग्रस्त झाला आहे. त्यानंतर संघाचे फिजिओ मैदानावर येऊन त्यांनी त्याला प्राथमिक उपचार दिले. परंतु त्या उपचारांचा परिणाम न झाल्याने त्याला तंबूत परतावे लागले आहे.

09:19 (IST) 12 Oct 2018
दोन्ही संघातील अंतिम ११ खेळाडू

09:15 (IST) 12 Oct 2018
नाणेफेक जिंकून विंडिजची प्रथम फलंदाजी; मुंबईकर शार्दूल ठाकूरला अंतिम संघात स्थान

नाणेफेक जिंकून विंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबईकर शार्दूल ठाकूरला अंतिम संघात स्थान मिळाले आहे. मोहम्मद शमीला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.

First Published on October 12, 2018 9:06 am

Web Title: west indies tour of india 2018 2nd test hyderabad day 1 live updates