India vs West indies 2nd test Day 2 : हैदराबाद येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीला शुक्रवारपासून सुरूवात झाली. या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३०८ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताने वर्चस्व राखले. भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी चांगली कामगिरी केली. कोहली वगळता तीनही खेळाडूंनी अर्धशतक ठोकले. कोहलीला मात्र अर्धशतक साजरे करता आले नाही. पण शेवटच्या सत्रात रहाणे आणि पंत केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने त्रिशतकी मजल मारली. सध्या रहाणे ७५ धावांवर तर पंत ८५ धावांवर खेळत आहे. विंडिजकडून होल्डरने २ तर वॅरीकन आणि गॅब्रियल यांनी १-१ बळी टिपला.

चहापानाची वेळ होईपर्यंत भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावा केल्या. पहिल्या कसोटीत शतकी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉने या सामन्यातही आपली चमक दाखवली आणि केवळ ३९ चेंडूत अर्धशतक ठोकले. पण तो ७० धावांवर बाद झाला. पाठोपाठ पुजाराही तंबूत परतला. विराट आणि रहाणे जोडीने भारताचा डाव सावरला. पण विराटचे अर्धशतक हुकले. तो ४५ धावांवर बाद झाला.

त्याआधी विंडीजचा पहिला डाव ३११ धावांत संपला. पहिल्या दिवसअखेर विंडिजने ७ बाद २९५ धावा केल्या होत्या. त्या धावसंख्येवरुन पुढे खेळताना आज मात्र त्यांना फार धावा जमवता आल्या नाहीत. तिसऱ्या सत्रात काहीसे प्रभावहीन ठरलेल्या भारतीय गोलंदाजांनी आज दिवसाच्या सुरुवातीला शानदार कमबॅक केले आणि १६ धावांमध्ये विंडीजचे ३ गडी टिपले. एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या चेसने आपले शतक झळकावले. उमेश यादवने डावात ६ बळी टिपले. तर कुलदीप यादवने ३ आणि अश्विनने १ गडी बाद केला.

Live Blog

17:02 (IST)13 Oct 2018
रहाणे-पंतची जोरदार फलंदाजी; दिवसअखेर भारत ४ बाद ३०८

दुसऱ्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३०८ धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताने वर्चस्व राखले. भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी चांगली कामगिरी केली. कोहली वगळता तीनही खेळाडूंनी अर्धशतक ठोकले.

15:53 (IST)13 Oct 2018
रहाणे-पंत यांची अर्धशतके; भारत भक्कम स्थितीत

विराट कोहली बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी डावाला आकार दिला. या दोघांनी आपली अर्धशतके एका पाठोपाठ एका चेंडूवर पूर्ण केली. रहाणेने एक धाव ५० धावा केल्या, तर ऋषभ पंत याने मागच्या दिशेला फटका मारून आपले अर्धशतक पूर्ण केले.

15:07 (IST)13 Oct 2018
रहाणे-पंतने डाव सावरला; भारताची दोनशे पार मजल

कर्णधार विराट कोहली ४५ धावांवर बाद झाला.  त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी डाव सावरला. त्यांच्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने २०० धावा पूर्ण केल्या.

14:15 (IST)13 Oct 2018
रहाणे-पंत मैदानात; चहापानापर्यंत भारत ४ बाद १७३

चहापानाची वेळ होईपर्यंत भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावा केल्या.  पृथ्वी शॉ ७०, पुजारा १० तर विराट ४५ धावांवर बाद झाला.  आता अजिंक्य रहाणे- ऋषभ पंत जोडी मैदानात खेळत आहे.

13:53 (IST)13 Oct 2018
कर्णधार विराट कोहली पायचीत; भारताला चौथा धक्का

विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने भारतीय कर्णधार विराट कोहलीला पायचीत केले. त्यामुळे भारताला चौथा धक्का बसला. कोहलीचे अर्धशतक ५ धावांनी हुकले. ४५ धावांच्या खेळीत ५ चौकार लगावले.

13:35 (IST)13 Oct 2018
विराट-रहाणे जोडीची अर्धशतकी भागीदारी; भारत दिडशे पार

पृथ्वी शॉ आणि चेतेश्वर पुजारा हे पाठोपाठ तंबूत परतले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली - उपकर्णधार अजिंक्य रहाणे जोडीने अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी डाव सावरत भारताची धावसंख्या दिडशे पार पोहोचवली.

12:34 (IST)13 Oct 2018
भारताला तिसरा धक्का; पृथ्वी शॉ पाठोपाठ पुजारा बाद

पृथ्वी शॉ बाद झाल्यावर पाठोपाठ चेतेश्वर पुजारा बाद झाला. त्याने ४१ चेंडू खेळून केवळ १० धावा केल्या. गॅब्रियलच्या गोलंदाजीवर राखीव खेळाडू हॅमिल्टन याने त्याचा झेल टिपला.

12:32 (IST)13 Oct 2018
पृथ्वी शॉ ७० धावांवर बाद; भारताचा दुसरा गडी तंबूत

तडाखेबाज अर्धशतकी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉ ला ७० धावांवर तंबूत परतावे लागले. वॅरीकॅनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. पृथ्वीने आपल्या ७० धावांच्या खेळीत ११ चौकार आणि १ षटकार खेचला.

11:02 (IST)13 Oct 2018
दुसऱ्या सामन्यातही राहुल अपयशी; भारताला पहिला धक्का

पहिल्या सामन्यात भोपळाही न फोडू शकलेला सलामीवीर लोकेश राहुल दुसऱ्या सामन्यातही अपयशी ठरला. केवळ ४ धावांवर राहुल तंबूत परतला. कर्णधार होल्डरचा उसळता चेंडू सोडण्याच्या नादात राहुलच्या बॅटची कड चेंडूला लागली आणि तो त्रिफळाचित झाला.

11:00 (IST)13 Oct 2018
भारताची धडाकेबाज सुरुवात

भारताने दमदार सुरुवात केली असून आठव्या षटकात भारताने अर्धशतक गाठले आहे. यात पृथ्वी शॉच्या ४२ धावांचे योगदान आहे, तर राहूलचे ४ धावांचे योगदान आहे.

10:09 (IST)13 Oct 2018
भारताचे 'कमबॅक', विंडीजचा डाव ३११ धावांत संपुष्टात

विंडीजचा पहिला डाव ३११ धावांत संपला. तिसऱ्या सत्रात काहीसे प्रभावहीन ठरलेल्या भारतीय गोलंदाजांनी आज दिवसाच्या सुरुवातीला शानदार कमबॅक केले आणि १६ धावांमध्ये विंडीजचे ३ गडी टिपले. एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या चेसने आपले शतक झळकावले. उमेश यादवने डावात ६ बळी टिपले. तर कुलदीप यादवने ३ आणि अश्विनने १ गडी बाद केला.

09:58 (IST)13 Oct 2018
शतकवीर रॉस्टन चेस बाद; विंडीजला नववा धक्का

चेसने झुंजार शतक केल्यानंतर अखेर तो बाद झाला. १०६ धावांवर त्याला उमेश यादवने बाद केले.  उमेश यादवने टाकलेला चेंडू चेसच्या बॅट आणि पायाच्या मधून गेला आणि तो त्रिफळाचित झाला. त्याने आपल्या शतकी खेळीत ८ चौकार आणि १ षटकार लगावला.

09:40 (IST)13 Oct 2018
रॉस्टन चेसचे झुंजार शतक; विंडीज तीनशे पार

पहिल्या दिवशी तिसऱ्या सत्रात विंडीजच्या होल्डर–चेस जोडीने भारताच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला होता. होल्डर बाद झाल्यावरही चेसने एकाकी झुंज दिली. आणि आपले शतक पूर्ण केले. त्याच्या शतकाच्या जोरावर विंडीजने त्रिशतकी मजल मारली.

09:40 (IST)13 Oct 2018
दिवसाच्या सुरूवातीलाच विंडिजला धक्का; आठवा गडी बाद

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आणि लगेचच भारताला पहिले यश मिळाले. विंडीजच्या देवेंद्र बिशू याला कुलदीप यादवने त्रिफळाचित केले. कुलदीपने टाकलेला चेंडू बिशूला न समजल्यामुळे त्याने चेंडूला बॅट लावली. त्यावेळी बॅटची कड लागून चेंडू यष्ट्यांवर आदळला.