17 September 2019

News Flash

IND vs WI : विराटसेनेचा ‘आठवा’ प्रताप! विंडीजवर ९ गडी राखून मात

India vs West indies 5th ODI - मालिका ३-१ने खिशात

IND vs WI 5th ODI  : विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात भारताने विंडीजला ९ गडी राखून पराभूत केले आणि विंडीजविरुद्ध सलग आठवा मालिका विजय नोंदवला. विंडीजचा डाव अवघ्या १०४ धावांत गुंडल्यानंतर भारताने हे आव्हान १५ षटकाच्या आत पूर्ण केले. रवींद्र जाडेजाच्या अप्रतिम फिरकीच्या जोरावर भारताने विंडीजला १०४ धावांत रोखले होते. त्यानंतर रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मालिका ३-१ने खिशात घातली. रवींद्र जाडेजाला सामनावीर तर विराट कोहलीला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण त्यांची सुरुवात खराब झाली. २ धावांत विंडीजने २ गडी माघारी परतले होते. त्यानंतर सम्युअल्सने काही काळ विंडीजच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण तो २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर सलामीवीर रोवमन पॉवेलने ३९ चेंडूत १६ धावा करून माघारी परतला. कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक २५ धावा करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला पण तोदेखील लवकर बाद झाला. या तीन खेळाडूंव्यतिरिक्त इतर कोणत्याही खेळाडूला २ आकडी धावसंख्या गाठता आली नाही. जाडेजाने ४, बुमराह व अहमदने २-२ तर कुलदीप आणि भुवनेश्वर कुमारने १-१ गडी बाद केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शिखर धवन हा ६ धावांवर तंबूत परतला. पण त्यानंतर रोहित शर्माने दमदार नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने ५६ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार लगावत ६२ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीने २९ चेंडूत ३३ धावांची संयमी खेळी करत त्याला उत्तम साथ दिली. विंडीजकडून थॉमसने एकमेव बळी टिपला.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

  • 13:14 (IST)

    नाणेफेक जिंकून विंडीजची प्रथम फलंदाजी

    या एकदिवसीय मालिकेत प्रथमच विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. या आधी प्रत्येक सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली यानेच नाणेफेक जिंकली होती.

16:51 (IST)01 Nov 2018
रोहितचे अर्धशतक, भारताचा विजय दृष्टीपथात

रोहितचे अर्धशतक, भारताचा विजय दृष्टीपथात

16:03 (IST)01 Nov 2018
धवन त्रिफळाचित, भारताला पहिला धक्का

भारताचा सलामीवीर शिखर धवन बाद झाला. थॉमसने त्याला ६ धावांवर त्रिफळाचित केले. शिखरने चौकार ठोकत चांगली सुरुवात केली होती. पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

15:44 (IST)01 Nov 2018
केमार रोच माघारी, विंडीजचा नववा गडी बाद

केमार रोच माघारी, विंडीजचा नववा गडी बाद

15:31 (IST)01 Nov 2018
विंडीजचा आठवा गडी बाद, किमो पॉल माघारी

भारताने विंडीजचा आठवा गडी बाद केला. कुलदीप यादवच्या चेंडूवर किमो पॉल झेलबाद झाला. त्याने १८ चेंडूत ५ धावा केल्या.

15:18 (IST)01 Nov 2018
कर्णधार होल्डर तंबूत, विंडीजचा सातवा गडी माघारी

विंडीजच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न करणारा कर्णधार जेसन होल्डर २५ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने २ चौकार लगावले. खलील अहमद याने फेकलेल्या चेंडूवर केदार जाधवने त्याला झेलबाद केले.

15:00 (IST)01 Nov 2018
विंडीजला सहावा धक्का, फॅबियन अॅलन माघारी

अडखळत फलंदाजी सुरु असलेल्या विंडीजचा पाय आणखी खोलात गेला. विंडीजने फॅबियन अॅलनच्या रूपात सहावा गडी गमावला. त्याने ११ चेंडूत केवळ ४ धावा केल्या.

14:46 (IST)01 Nov 2018
विंडीजचा पाचवा गडी माघारी, रोवमन पॉवेल बाद

हेटमायर पाठोपाठ विंडीजने रोवमन पॉवेललाही गमावले. रोवमनने अतिशय शांत खेळी करत ३९ चेंडूत १६ धावा केल्या. पण दुसऱ्या बाजूने गडी बाद होण्यास सुरुवात झाल्यावर त्याने फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण तो त्याच प्रयत्नात बाद झाला.

14:40 (IST)01 Nov 2018
शिमरॉन हेटमायर पायचीत, विंडीजला चौथा धक्का

तडाखेबाज खेळी करणारा फलंदाज शिमरॉन हेटमायर बाद झाला. जाडेजाने त्याला पायचीत केले. पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते. पण DRS दरम्यान त्याला तिसऱ्या पंचांनी बाद ठरवले.

14:22 (IST)01 Nov 2018
जाडेजाने टिपला सॅम्युअल्सचा बळी, विंडीजला तिसरा झटका

जाडेजाने सामन्यातील पहिला बळी टिपला. विंडीजचा अनुभवी फलंदाज मार्लन सॅम्युअल्स भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच जाडेजाने त्याचा अडसर दूर केला. त्याने ३८ चेंडूत २४ धावा केल्या.

13:40 (IST)01 Nov 2018
शाई होप बाद, विंडीजला दुसरा धक्का

विंडीजला बरेच 'होप' असलेला फलंदाज शाई होप शून्यावर बाद झाला. बुमराहच्या आत येणाऱ्या चेंडूला बॅट लागल्यामुळे चेंडू स्टंपवर आदळला आणि तो त्रिफळाचित झाला.

13:35 (IST)01 Nov 2018
विंडीजचा पहिला गडी बाद, कायरन पॉवेल माघारी

सामन्याच्या पहिल्याच षटकात भारताने विंडीजचा पहिला गडी माघारी धाडला. सलामीवीर कायरन पॉवेल भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. धोनीने यष्ट्यांच्या मागे त्याचा अप्रतिम झेल टिपला.

13:14 (IST)01 Nov 2018
नाणेफेक जिंकून विंडीजची प्रथम फलंदाजी

या एकदिवसीय मालिकेत प्रथमच विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. या आधी प्रत्येक सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली यानेच नाणेफेक जिंकली होती.

First Published on November 1, 2018 1:02 pm

Web Title: west indies tour of india 2018 5th odi mumbai live updates online