राजकोट कसोटीपाठोपाठ भारताने हैदराबाद कसोटीतही विंडीजवर मात करुन 2 सामन्यांच्या मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. विंडीजचे विजयासाठी दिलेलं 72 धावांचं आव्हान भारताने एकही गडी न गमावता पूर्ण केलं आहे. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉने आणि लोकेश राहुल धावा केल्या. १० बळी टिपणाऱ्या उमेश यादवला सामनावीर तर पृथ्वी शॉला मालिकावीर घोषित करण्यात आले. दरम्यान तिसऱ्या दिवसाच्या खेळात तब्बल 7 विक्रमांची नोंद करण्यात आली.

1 – कसोटी क्रिकेटमध्ये विंडीजवर 10 गडी राखून मात करण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली.

2 – इम्रान खाननंतर एका प्रतिस्पर्ध्याविरोधात फलंदाजीतत 50 च्या वर तर गोलंदाजीत 25 च्या खाली सरासरी राखणारा रविचंद्रन आश्विन दुसरा गोलंदाज ठरला आहे.

3 – घरच्या मैदानात कसोटी सामन्यात 10 विकेट घेण्याची कामगिरी करणारा उमेश यादव तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी कपिल देव आणि जवागल श्रीनाथ यांनी अशी कामगिरी केली आहे.

3 – कसोटी क्रिकेटमध्ये 4 चेंडूंमध्ये 3 बळी घेणारा उमेश यादव तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

7 – वेस्ट इंडिजचे दोन्ही सलामीवीर शून्यावर बाद होण्याची ही सातवी वेळ ठरली.

18 – वयाच्या 18 व्या वर्षी भारतासाठी विजयी धाव काढणारा पृथ्वी शॉ सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

4222* – आशिया खंडात कर्णधार या नात्याने विराटने 4 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे, विराटने पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हकचा विक्रम मोडला आहे.