News Flash

मुंबईच्या मैदानात विराटसेनेने रोखलं कॅरेबिअन वादळ, टी-२० मालिकेतही मारली बाजी

वेस्ट इंडिजकडून कर्णधार पोलार्डची एकाकी झुंज

गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजवर ६७ धावांनी मात केली आहे. या विजयासह ३ टी-२० सामन्यांची मालिकाही भारतीय संघाने २-१ ने जिंकली. विजयासाठी दिलेलं २४१ धावांचं आव्हान विंडीजला पेलवलं नाही. पाहुण्या संघाचे फलंदाज १७३ धावांपर्यंतच मजल मारु शकले. भारताकडून भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दीपक चहर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

अवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्मा @ 400, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज

खडतर आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवातही खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत विंडीजचे ३ फलंदाज माघारी परतले. यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कायरन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. हे फलंदाज विंडीजचा डाव सावरणार असं वाटत असतानाच, कुलदीप यादवने हेटमायरचा अडसर दूर केला. मात्र यानंतरही कायरन पोलार्डने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत पोलार्डने उत्तुंग षटकार ठोकले. मात्र ६८ धावांवर पोलार्ड माघारी परतल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी हार मानली. यानंतरची भारतीय गोलंदाजांनी आपली उरली-सुरली जबाबदारी पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी, सलामीवीर रोहित शर्मा-लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात धावांचा डोंगर उभा केला. ३ गड्यांच्या मोबदल्यात भारताने २४० धावा केल्या. विंडीजच्या सर्व गोलंदाजांना आज भारतीय फलंदाजांच्या फटकेबाजीचा सामना करावा लागला. भारताकडून लोकेश राहुलने ९१, रोहित शर्माने ७१ तर कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७० धावा केल्या. विंडीजकडून कोट्रेल, विल्यम्स आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. विंडीजविरुद्ध भारताची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधली ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.

अवश्य वाचा – IND vs WI : घरच्या मैदानावर ‘हिटमॅन’ची फटकेबाजी, शाहिद आफ्रिदीला टाकलं मागे

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करत विंडीजच्या आक्रमणातली हवाच काढून घेतली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी चौफेर फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी १३५ धावा जोडल्या. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. रोहित शर्मा ७१ धावांवर माघारी परतल्यानंतर संघ व्यवस्थापनाने विराट कोहली ऐवजी ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली.

अवश्य वाचा – IND vs WI : ऋषभ पंतची हाराकिरी सुरुच, टी-२० क्रिकेटमध्ये लाजिरवाणा विक्रम नावावर

मात्र पंतने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. पोलार्डच्या गोलंदाजीवर पंत भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने लोकेश राहुलच्या साथीने फटकेबाजी करत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराटने आक्रमक फटकेबाजी करत विंडीजच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. राहुल ९१ धावा काढून अखेरच्या षटकात माघारी परतला.

अवश्य वाचा – IND vs WI : वानखेडे मैदानावर ‘किंग कोहली’ चमकला, विंडीज गोलंदाजांची केली धुलाई

लोकसत्ता समालोचन
Live Blog
22:45 (IST)11 Dec 2019
भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब

६७ धावांनी भारताची सामन्यात बाजी, मालिकाही २-१ ने जिंकली

22:40 (IST)11 Dec 2019
विंडीजला आठवा धक्का

चहरच्या गोलंदाजीवर पेरी माघारी, जाडेजाने घेतला झेल

22:32 (IST)11 Dec 2019
वेस्ट इंडिजला सातवा धक्का

मोहम्मद शमीने उडवला वॉल्शचा त्रिफळा

22:24 (IST)11 Dec 2019
अखेरीस पोलार्ड माघारी, वेस्ट इंडिजला सहावा धक्का

३९ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने पोलार्डच्या ६८ धावा

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजाने घेतला झेल

22:14 (IST)11 Dec 2019
वेस्ट इंडिजच्या कर्णधाराची झुंज

भारतीय गोलंदाजांचा सामना करत झळकावलं अर्धशतक

21:54 (IST)11 Dec 2019
शेमरॉन हेटमायर - कायरन पोलार्डची जोडी फुटली

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर हेटमायर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद

सीमारेषेवर लोकेश राहुलने घेतला झेल, हेटमायरच्या ४१ धावा

21:18 (IST)11 Dec 2019
वेस्ट इंडिजला तिसरा धक्का, निकोलस पूरन माघारी

दिपक चहरच्या गोलंदाजीवर शिवम दुबेने घेतला झेल, पूरन भोपळाही न फोडता माघारी

21:14 (IST)11 Dec 2019
वेस्ट इंडिजला दुसरा धक्का, लेंडन सिमन्स माघारी

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात सिमन्स झेलबाद

21:08 (IST)11 Dec 2019
वेस्ट इंडिजला पहिला धक्का, ब्रँडन किंग माघारी

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलने घेतला झेल

20:53 (IST)11 Dec 2019
विराटची अखेरच्या षटकात फटकेबाजी सुरुच

भारताची २४० धावांपर्यंत मजल, विंडीजला विजयासाठी २४१ धावांचं खडतर आव्हान

20:46 (IST)11 Dec 2019
अखेरच्या षटकात लोकेश राहुल माघारी

९१ धावा करुन राहुल कोट्रेलच्या गोलंदाजीवर बाद

20:38 (IST)11 Dec 2019
कर्णधार विराट कोहलीचंही अर्धशतक

मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत, झळकावलं अर्धशतक

भारतीय संघाची सामन्यावर मजबूत पकड, विंडीजचे गोलंदाज हतबल

20:35 (IST)11 Dec 2019
लोकेश राहुल - विराट कोहलीची फटकेबाजी

भारतीय संघाने ओलांडला द्विशतकी टप्पा

तिसऱ्या विकेटसाठी केली अर्धशतकी भागीदारी

20:14 (IST)11 Dec 2019
ऋषभ पंतची खराब कामगिरी सुरुच, भोपळाही न फोडता माघारी

तिसऱ्याी क्रमांकावर बढती मिळालेल्या पंतकडून पुन्हा एकदा निराशा

पोलार्डच्या गोलंदाजीवर जेसन होल्डरकडे झेल देऊन परतला माघारी

20:08 (IST)11 Dec 2019
भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

केजरिक विल्यम्स भारताची जमलेली जोडी फोडण्यात यशस्वी, उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा झेलबाद

३४ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने रोहित शर्माच्या ७१ धावा

अवश्य वाचा - IND vs WI : घरच्या मैदानावर ‘हिटमॅन’ची फटकेबाजी, शाहिद आफ्रिदीला टाकलं मागे

19:47 (IST)11 Dec 2019
लोकेश राहुलनेही झळकावलं अर्धशतक

सामन्यावर भारतीय संघाचं वर्चस्व

19:40 (IST)11 Dec 2019
रोहित शर्माचं अर्धशतक

भारताने ८ व्या षटकातच ओलांडला १०० धावांचा टप्पा

घरच्या मैदानावर रोहितची फटकेबाजी

19:25 (IST)11 Dec 2019
भारतीय संघाची आक्रमक सुरुवात, रोहित शर्माची फटकेबाजी

विंडीजच्या गोलंदाजांवर रोहितचं आक्रमण, ओलांडला ५० धावांचा टप्पा

अवश्य वाचा - IND vs WI : रोहित शर्मा @ 400, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज

18:43 (IST)11 Dec 2019
जाणून घ्या वेस्ट इंडिजचा अंतिम ११ जणांचा संघ...
18:42 (IST)11 Dec 2019
जाणून घ्या असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ
18:41 (IST)11 Dec 2019
महत्वाच्या सामन्यात भारतीय संघात दोन बदल

रविंद्र जाडेजाच्या जागी मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान

18:41 (IST)11 Dec 2019
अखेरच्या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकली

कायरन पोलार्डचा गोलंदाजी करण्याचा निर्णय, संघात कोणतेही बदल नाहीत

टॅग : Ind Vs WI
Next Stories
1 अफगाणिस्तानचं नेतृत्व पुन्हा एकदा असगर अफगाणकडे
2 सुनील गावसकर म्हणतात, “विंडीजविरूद्ध जिंकायचंय तर…”
3 Ranji Trophy 2019 : पृथ्वी शॉचं द्विशतक, बडोद्याला विजयासाठी डोंगराएवढं आव्हान
Just Now!
X