26 October 2020

News Flash

टीम इंडियाचा सरत्या वर्षाला विजयी निरोप, मुंबईकर शार्दुलची निर्णायक फटकेबाजी

कर्णधार विराट कोहलीची निर्णयाक अर्धशतकी खेळी

कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात वेस्ट इंडिजवर मात केली आहे. विंडीजने विजयासाठी दिलेलं ३१६ धावांचं आव्हान भारताने ४ गडी राखून पूर्ण केलं. २०१९ वर्षातला भारताचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता, त्यामुळे वर्षाची अखेर मालिका विजयाने करत आगमी वर्षासाठी भारतीय संघ असाच फॉर्म कायम राखण्यासाठी नव्याने सुरुवात करेल यात शंका नाही. भारताने ३ वन-डे सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली आहे.

विंडीजने विजयासाठी दिलेल्या दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आक्रमक झाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकं झळकावत पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. जेसन होल्डरने रोहित शर्माला माघारी धाडत भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर ठराविक अंतराने लोकेश राहुलही माघारी परतला. राहुलने ७७ तर रोहितने ६३ धावा केल्या. श्रेयस अय्यर, केदार जाध आणि ऋषभ पंत स्वस्तात माघारी परतल्यामुळे भारतीय गोटात चिंतेचं वातावरण पसरलं होतं.

मात्र यानंतर विराटने एक बाजू लावून धरत रविंद्र जाडेजाच्या साथीने भारताचा डाव सावरला. विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना विराट त्रिफळाचीत झाला. ८५ धावांवर किमो पॉलने त्याचा त्रिफळा उडवला. यानंतर रविंद्र जाडेजाने मुंबईकर शार्दुल ठाकूरच्या साथीने उरलेल्या धावा पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. विंडीजकडून किमो पॉलने ३ तर शेल्डन कॉट्रेल, अल्झारी जोसेफ आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्डने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर, वेस्ट इंडिजने अखरेच्या वन-डे सामन्यात ३१५ धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या वन-डे सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत विंडीजला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही, मात्र अखेरच्या षटकांमध्ये पूरन आणि पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. निकोलस पूरनने ८९ तर पोलार्डने नाबाद ७४ धावा केल्या.

कटकच्या मैदानावर फलंदाज धावांची बरसात करतील असा अंदाज होता, मात्र विंडीजच्या फलंदाजांनी सावध सुरुवात केली. शाई होप आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. मात्र यासाठी त्यांनी बरेच चेंडू खर्च केले. रविंद्र जाडेजाने विंडीजची जोडी फोडली. यानंतर रोस्टन चेस, हेटमायर आणि होप यांनी फटकेबाजी करत विंडीजचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. मात्र सैनीने हेटमायर आणि चेसला तर शमीने होपला माघारी धाडत विंडीजला धक्का दिला.

यानंतर पूरन जोडीने अखेरच्या षटकांमध्ये सामन्याची सुत्र आपल्या हाती घेत फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. दुसऱ्या बाजूने त्याला कर्णधार पोलार्डनेही उत्तम साथ दिली. अखेरच्या टप्प्यात भारतीय गोलंदाज विंडीजच्या फलंदाजांवर अंकुश ठेवू शकले नाहीत. भारताकडून पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीने २ तर रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने १-१ बळी घेतला.

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

 • 15:40 (IST)

  वेस्ट इंडिजला तिसरा धक्का, हेटमायर माघारी

  नवदीप सैनीने घेतला वन-डे क्रिकेटमधला पहिला बळी

  उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात कुलदीप यादवकडे झेल देऊन माघारी, ३७ धावांची केली खेळी

 • 14:57 (IST)

  वेस्ट इंडिजला दुसरा धक्का, होप बाद

  मोहम्मद शमीने उडवला त्रिफळा, होपच्या ४२ धावांची खेळी

 • 14:40 (IST)

  अखेरीस विंडीजची सलामीची जोडी फुटली, लुईस माघारी

  रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात लुईस झेलबाद

  सीमारेषेवर नवदीप सैनीने घेतला झेल, ५७ धावांवर विंडीजचा पहिला गडी बाद

21:42 (IST)22 Dec 2019
मुंबईकर शार्दुल ठाकूर आणि रविंद्र जाडेजाची निर्णयाक फटकेबाजी

भारत अखेरच्या वन-डे सामन्यात ४ गडी राखून विजयी, मालिकेतही २-१ ने मारली बाजी

21:22 (IST)22 Dec 2019
भारताला मोठा धक्का, विराट कोहली माघारी

८५ धावांवर विराट किमो पॉलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत

किमो पॉलचा सामन्यातला तिसरा बळी

20:49 (IST)22 Dec 2019
केदार जाधव त्रिफळाचीत, भारताला पाचवा धक्का

शेल्डन कॉट्रेलने उडवला जाधवचा त्रिफळा, दुसऱ्या बाजूने कर्णधार कोहलीची मात्र एकाकी झुंज

झळकावलं अर्धशतक, भारताचा निम्मा संघ माघारी परतला

20:28 (IST)22 Dec 2019
ऋषभ पंत पुन्हा अपयशी, भारताला चौथा धक्का

किमो पॉलच्या गोलंदाजीवर चेंडू बॅटची कड घेऊन थेट यष्टींवर

अवघ्या ७ धावा काढून पंत माघारी परतला

20:14 (IST)22 Dec 2019
श्रेयस अय्यर माघारी, भारताला तिसरा धक्का

किमो पॉलच्या गोलंदाजीवर जोसेफने घेतला झेल

20:04 (IST)22 Dec 2019
भारताला दुसरा धक्का, लोकेश राहुल माघारी

अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक होपने घेतला झेल

८९ चेंडूत राहुलच्या ७७ धावा, अर्धशतकी खेळीत राहुलचे ८ चौकार आणि एक षटकार

19:27 (IST)22 Dec 2019
अखेरीस भारताची जमलेली जोडी फुटली, रोहित शर्मा माघारी

जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक शाई होपकडे झेल देऊन परतला माघारी

रोहितच्या ६३ चेंडूत ६३ धावा, अर्धशतकी खेळीत ८ चौकार आणि एका षटकाराचा समावेश

पहिल्या विकेटसाठी रोहित-राहुल जोडीची १२२ धावांची भागीदारी

19:11 (IST)22 Dec 2019
रोहित शर्माचं अर्धशतक

राहुलपाठोपाठ रोहितनेही झळकावलं अर्धशतक, भारतीय संघाची आक्रमक सुरुवात

19:05 (IST)22 Dec 2019
लोकेश राहुलचं अर्धशतक, भारतीय सलामीवीरांची शतकी भागीदारी

भारतीय सलामीवीरांची सामन्यावर पकड

18:37 (IST)22 Dec 2019
भारतीय सलामीवीरांची आक्रमक सुरुवात

रोहित शर्मा - लोकेश राहुलची पहिल्या विकेटसाठी महत्वपूर्ण भागीदारी

अवश्य वाचा - IND vs WI : रोहित शर्माने मोडला सनथ जयसूर्याचा विक्रम, तो ही अवघ्या ९ धावांत

17:26 (IST)22 Dec 2019
वेस्ट इंडिजची ३१५ धावांपर्यंत मजल

भारताला विजयासाठी ३१६ धावांचं आव्हान

17:17 (IST)22 Dec 2019
कर्णधार कायरन पोलार्डचं अर्धशतक

नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर पोलार्डची फटकेबाजी, विंडीजची ३०० धावसंख्येच्या दिशेने वाटचाल

17:13 (IST)22 Dec 2019
अखेरीस पूरन माघारी, शार्दुल ठाकूरने घेतला बळी

अखेरच्या षटकांत फटकेबाजी करणारा पूरन माघारी, शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजाने घेतला कॅच

पूरनच्या ६४ चेंडूत ८९ धावा, अर्धशतकी खेळीत पूरनचे १० चौकार आणि ३ षटकार

16:46 (IST)22 Dec 2019
निकोलस पूरनचं अर्धशतक

कायरन पोलार्डसोबत महत्वाची अर्धशतकी भागीदारी

16:38 (IST)22 Dec 2019
विंडीजने ओलांडला २०० धावांचा टप्पा

पोलार्ड आणि निकोलस पूरन जोडीची फटकेबाजी

15:49 (IST)22 Dec 2019
विंडीजला चौथा धक्का, रोस्टन चेस त्रिफळाचीत

नवदीप सैनीच्या यॉर्कर चेंडूवर चेस पुरता फसला, विंडीजचा चौथा गडी माघारी

15:40 (IST)22 Dec 2019
वेस्ट इंडिजला तिसरा धक्का, हेटमायर माघारी

नवदीप सैनीने घेतला वन-डे क्रिकेटमधला पहिला बळी

उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात कुलदीप यादवकडे झेल देऊन माघारी, ३७ धावांची केली खेळी

14:57 (IST)22 Dec 2019
वेस्ट इंडिजला दुसरा धक्का, होप बाद

मोहम्मद शमीने उडवला त्रिफळा, होपच्या ४२ धावांची खेळी

14:40 (IST)22 Dec 2019
अखेरीस विंडीजची सलामीची जोडी फुटली, लुईस माघारी

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात लुईस झेलबाद

सीमारेषेवर नवदीप सैनीने घेतला झेल, ५७ धावांवर विंडीजचा पहिला गडी बाद

14:32 (IST)22 Dec 2019
वेस्ट इंडिजची सावध सुरुवात

एविन लुईस आणि शाई होपची पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

भारतीय गोलंदाजांचाही भेदक मारा

13:17 (IST)22 Dec 2019
विंडीजच्या संघात कोणताही बदल नाही...

असा असेल विंडीजचा अंतिम ११ जणांचा संघ....

13:17 (IST)22 Dec 2019
अखेरच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

भारतीय संघात एक बदल, नवदीप सैनीचं वन-डे संघात पदार्पण

टॅग Ind Vs WI
Just Now!
X