मुंबई महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या पुरुष व्यावसायिक गटात पश्चिम रेल्वे आणि मुंबई पोलिसांनी विजयी सलामी दिली. महिपालच्या उत्कृष्ट चढाया आणि साईनाथ काळसेकरच्या अचूक पकडींच्या बळावर पश्चिम रेल्वेने गुरुकुल, रत्नागिरीचा २७-२२ असा पराभव केला. बँक ऑफ इंडियाने मध्य रेल्वेवर १४-१२ असा निसटता विजय मिळवला. विजय जाधव, सूरज बनसोडे यांनी सुरेख खेळ केला. मुंबई पोलिसांनी यजमान मुंबई महानगरपालिकेवर १९-११ असा विजय मिळवला. अभिमन्यू चव्हाणच्या यशस्वी चढाया आणि विशाल तळेकरच्या उत्कृष्ट पकडींमुळे मुंबई पोलिसांनी हा विजय साकारला. महिला गटाच्या लढतींमध्ये शिवशक्ती महिला संघाने उपनगरच्या सावित्रीबाई फुले संघाला ४२-१७ असे नमवले. ऋतुजा देऊलकरच्या उत्कृष्ट चढाया आणि सुवर्णा बारटक्केच्या यशस्वी पकडींनी शिवशक्तीने हा विजय मिळवला. मुंबई पोलीस संघाने अमरहिंदवर १०-७ असा विजय मिळवला.  ठाण्याच्या शिवछत्रपतीने विश्वशांतीचा २९-७ असा, तर डॉ. शिरोडकरने उपनगरच्या महात्मा गांधी संघाचा २६-२० असा पराभव केला. अमर हिंदने संघर्षवर २४-२३ असा विजय मिळवला.

sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त
South Central Mumbai
दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून माजी नगरसेवक, कार्यकर्त्यांत धुसफूस, शिवसेनेकडून प्रचार फेऱ्यांना सुरुवात
North Mumbai
आमचा प्रश्न.. उत्तर मुंबई : रेल्वेची जीवघेणी वाहतूक कधी सुधारणार, माजी रेल्वे मंत्र्यांच्या उमेदवारीमुळे समस्या सुटण्याची आशा
Controversies in the Grand Alliance about constituencies like South Mumbai, North West Mumbai, Satara Amravati  Sambhajinagar Nashik  Shirdi Ratnagiri Sindhudurg
तिसऱ्यांदा दिल्लीवारी; शिंदे, अजित पवार शहांच्या भेटीस, महायुतीत पेच कायम