News Flash

‘‘तू Googleवर शेवटचं काय सर्च केलं होतं?”, वाचा विराटनं दिलेलं उत्तर

इन्स्टाग्रामवर विराटनं आयोजित केलं होतं प्रश्नोत्तराचं सत्र

विराट कोहली

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट क्षेत्रात खूप यश मिळवले आहे. क्रिकेटव्यतिरिक्त त्याला फुटबॉल पाहण्याचेही वेड आहे. ३२ वर्षीय कोहली अनेक वेळा फुटबॉल खेळताना दिसला आहे, शिवाय त्याला या खेळाबद्दल गप्पा मारण्यासही आवडते. विराट पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा मोठा चाहता आहे आणि हे विराटच्या चाहत्यांनाही ठाऊक आहे.

गेल्या वर्षी इंस्टाग्राम लाइव्हवर भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने विराटबरोबर संवाद साधला होता. तेव्हा विराटने आपण रोनाल्डोच्या जुव्हेंटस संघाचा मोठा चाहता असल्याचे सांगितले होते. त्यामुळे विराट रोनाल्डोसंबंधी एकही गोष्ट जाणून घेण्यात चुकत नाही. विराटला एका चाहत्याने इन्स्टाग्रामवर प्रश्न विचारला, तेव्हा त्याने उत्तरातही रोनाल्डोचे नाव घेतले.

हेही वाचा – ‘‘त्या दीड वर्षात मला रात्रीची झोप यायची नाही”, स्टार क्रिकेटपटूने सांगितला वाईट काळातील अनुभव

तू गूगलवर शेवटचे काय सर्च केले होते?, असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. तेव्हा त्याने ‘ख्रिस्तियानो रोनाल्डोची ट्रान्स्फर’ असे उत्तर दिले. इंस्टाग्रामवर शनिवारी विराटने प्रश्नोत्तराचे सत्र आयोजित केले. या कालावधीत त्याला बरेच प्रश्न विचारले गेले होते.

हेही वाचा – जबरदस्त क्रिकेट कारकीर्द असूनही क्रिकेटच्या देवाला वाटतेय ‘या’ दोन गोष्टींची खंत!

फुटबॉल विश्वात रोनाल्डोच्या बदली झाल्याच्या बातम्या काही काळ चर्चेचा विषय ठरल्या आहेत. पाच वेळचा बॅलन डी ऑर विजेता रोनाल्डो सध्या जुव्हेंटसचा एक भाग आहे आणि पुढच्या मोसमात त्याचे संघ बदलेल अशी आशा आहे. पुढच्या हंगामात ३६ वर्षीय पोर्तुगीज स्टार रोनाल्डो कुठो जाईल हे जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत आणि विराटचाही या चाहत्यांमध्ये समावेश आहे. सध्या विराट पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तयारीमध्ये व्यस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 6:30 pm

Web Title: what was the last time virat kohli searched google adn 96
Next Stories
1 ‘‘त्या दीड वर्षात मला रात्रीची झोप यायची नाही”, स्टार क्रिकेटपटूने सांगितला वाईट काळातील अनुभव
2 जबरदस्त क्रिकेट कारकीर्द असूनही क्रिकेटच्या देवाला वाटतेय ‘या’ दोन गोष्टींची खंत!
3 चॅम्पियन्स लीग : मँचेस्टर सिटीला नमवत चेल्सीने पटकावले विजेतेपद
Just Now!
X