संघातील मधल्या फळीतील खेळाडू संघाची खरी ताकद दाखवून देणारे असतात. दबावावेळी शांतपणे तर कधी गरज ओळखून आक्रमक खेळी साकारण्याची तयारी ठेवणे हे गुण मधल्या फळीतील खेळाडूंमध्ये असणे महत्त्वाचे ठरतात. आणि क्रिकेट जगतातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धेसाठी संघ निवडायचा झाल्यास संघाची मधली फळी भक्कम असल्याशिवाय गत्यंतर नाही.
यंदाच्या विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या मधल्या फळीची जबाबदारी सांभाळण्यासाठी रॉबिन उथप्पा, सुरेश रैना, केदार जाधव, मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे, संजु सॅमसन, अंबाती रायुडू, रविंद्र जडेजा, परवेझ रसूल हे पर्याय उपलब्ध आहेत.
सुरेश रैना, रविंद्र जडेजा यांच्या अष्टपैलू गुणामुळे मधल्या फळीसाठी हे दोघे दावेदार असले तरी, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, रॉबिन उथप्पा हे देखील संघासाठी ‘मॅच विनर’ खेळाडू ठरू शकतात. तसेच संजु सॅमसन, परवेझ रसूल, मनोज तिवारी, केदार जाधव या युवा खेळाडूंनी देखील रणजी आणि स्थानिक सामन्यांत दमदार कामगिरी करून विश्वचषकाच्या संघात जबाबदारी पेलण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे अंतिम पंधरा खेळाडूंचा भारतीय संघ निवडताना आणि त्यातल्या त्यात मधली फळी निवडताना ‘बीसीसीआय’च्या निवड समितीची कसोटी लागणार आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी व्यतिरिक्त आणखी कोणते तीन चेहरे संघाच्या मधल्या फळीची धुरा यशस्वीरित्या सांभाळू शकतील?
(पुढील पर्यायांपैकी तीन खेळाडू निवडणे अनिवार्य)