08 August 2020

News Flash

सरदार पहली बार नमाज पढने आया है, अब अल्लाह उनकी पहली सुनेगा !

जेव्हा बलबीर सिंह भारतीय संघासाठी मशिदीत नमाज पढतात

काही दिवसांपूर्वी भारतीय हॉकी संघाचे माजी खेळाडू बलबीर सिंह (सिनीअर) यांचं वृद्धापकाळाचं निधन झालं. २५ मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेल्या बलबीर सिंह यांच्या निधनानंतर देशभरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी शोक व्यक्त केला होता. हॉकीतून निवृत्ती स्विकारल्यानंतर बलबीर सिंह काही काळासाठी भारतीय संघाचे व्यवस्थापकही होते. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि ऑलिम्पिअन अस्लम शेर खान यांनी, बलबीर सिंह यांचा १९७५ च्या विश्वचषकादरम्यानचा एक किस्सा सांगितला. ते इंडियन एक्स्प्रेसच्या पॉडकास्टमध्ये बोलत होते.

१९७५ साली भारतीय हॉकी संघात अस्लम शेर खान हे एकमेव मुस्लीम खेळाडू होते. मलेशियातील क्वाललांपूर येखील मशिदीत अस्लम नमाज पठनासाठी जाण्याच्या तयारीत होते. या बसमध्ये काही पाकिस्तानी खेळाडू होते. “मला आजही आठवतंय, बलबीर सिंह माझ्या खोलीत आले आणि मला म्हणाले, बाळा आज मी पण तुझ्यासोबत नमाज पठन करायला येतो. मी आणि बलबीर सिंह एकत्र मशिदीत घेतो, त्यांनी त्या दिवशी लाल रंगाची पगडी घातली होती. काही दिवसांनी आमचा पाकिस्ताशी सामना होता. बलबीर सिंह मशिदीत आल्याचा पाकिस्तानी संघावर एक वेगळाच मानसिक फरक पडला. अब्दुल रशिद (ज्युनिअर) हे पाकिस्तानी दिग्गज हॉकीपटू आहेत, त्यांनी त्यावेळी आपल्या खेळाडूंजवळ जाऊन सांगितलं. आता आपलं जिंकणं कठीण आहे. सर्व खेळाडूंनी त्यांना असं का?? विचारलं असता रशिद म्हणाले, पहिल्यांदा एक सरदारजी मशिदीत नमाज अदा करायला आला आहे. आता अल्लाह पहिल्यांदा त्यांची प्रार्थना ऐकेल. भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानवर २-१ ने मात करत विजेतेपद पटकावलं होतं.” अस्लम शेर खान बलबीर सिंग यांच्या आठवणी सांगत होते.

विश्वचषक विजेता भारतीय हॉकी संघ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या समवेत

 

“बलबीर यांचा काळ भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ मानला जातो. पण मैदानाप्रमाणेच मैदानाबाहेरही ते महान होते. त्यांनी कधीही कोणत्याही धर्मामध्ये भेदभाव केला नाही. प्रत्येक भारतीय खेळाडूने एकत्र रहावं यासाठी ते कायम आग्रही असायचे.” अस्लम शेर खान बोलत होते. अस्लम शेर खान यांना १९७५ च्या स्पर्धेत साखळी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र उपांत्य फेरीत मलेशियाविरुद्ध व्यवस्थापक आणि प्रशिक्षक यांच्यात मायकल किंडो की अस्लम शेर खान यापैकी कोणाला संधी द्यावी यावरुन चर्चा सुरु होती. अखेरीस व्यवस्थापकांचं मत ऐकून प्रशिक्षकांनी अस्लम शेर खान यांना संघात संधी दिली. यावेळी व्यवस्थापकांनी अस्लम यांच्या जवळ जात, जा बेटा अब तेरा खुदा ही भारत को बचा सकता है ! असं प्रोत्साहन दिलं होतं.

दोन मिनीटांनीच अस्लम शेर खान यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्यामुळे अतिरीक्त वेळ देण्यात आली. अखेरीस भारताकडून हरचरण सिंह यांनी अतिरीक्त वेळेत गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2020 2:40 pm

Web Title: when balbir singh sr offered namaz with aslam sher khan psd 91
Next Stories
1 “…पर मारना तो पडेगा”; पियुष चावलाने सांगितला धोनीबद्दलचा भन्नाट किस्सा
2 Video : रोहित-धवन लाईव्ह चॅटमध्येच खो-खो हसत सुटले अन्…
3 सचिनला शतक पूर्ण न करु देणारा खेळाडू आज करतोय शाळेत शिक्षकाची नोकरी
Just Now!
X