विश्वचषकातील एका सामन्यादरम्यान ‘गूगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरची भेट घेतली. दोन्ही दिग्गजांच्या भेटीची चर्चा सोशल मीडियावर झाली. सचिन तेंडुलकरने सुंदर पिचाई यांच्यासोबतचा तो फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोला सचिनने अतिशय मजेदार कॅपशन दिले होते. विशेष म्हणजे…फोटो सचिन आणि सुंदर पिचाई यांचा आणि सोशल मीडियावर चर्चा मात्र धोनीची झाली.

सचिन तेंडुलकरने ‘क्या ये सुंदर फोटो है?’ असे फोटोला कॅपशन दिले होते. सचिन तेंडुलकरने पोस्ट केलेल्या या फोटोला उत्तर देताना सुंदर पिचाई यांनी धोनीच्या नावाचा उल्लेख केला.

पिचाई लिहतात…’ माही भाई म्हणतो, त्याप्रमाणे हा फोटो खूपच चांगला आहे. तुमच्यासोबत सामना पाहून आनंद झाला. (As Mahi bhai would say, “Bahut Badhiya”Pleasure watching the game with you, brought back great memories, till next time ) असे उत्तर पिचाई यांनी सचिनच्या ट्विटला दिले आहे.

सामन्यादरम्यान यष्टीरक्षण करताना धोनीच्या तोंडातून बहोत बढिया हा शब्द अनेकवेळा ऐकायला मिळाला आहे. धोनी बहोत बढिया म्हणत गोलंदाजाचा हिम्मत वाढवत असतो.

सुंदर पिचाई यांना क्रिकेटचे मोठे चाहते म्हणून ओळखले जाते. विश्वचषकापूर्वी पिचाईंना अंतिम सामना कोणाचा होईल असे विचारले असता त्यांनी भारत आणि इंग्लंड संघाचे नाव घेतले होते. या दोन्ही संघामध्ये अंतिम सामना होईल असे त्यांना वाटत होते. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पिचाईंचे आवडते संघ आहेत.