04 August 2020

News Flash

पुजाराला बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांनी रचला होता कट, संघाबाहेर असलेल्या खेळाडूचा खुलासा

पुजारानेही दिलं सडेतोड प्रत्युत्तर

चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघाचा महत्वाचा खेळाडू मानला जातो. तंत्रशुद्ध फलंदाजी, भक्कम बचाव आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांना नामोहरम करुन सोडणारे फटके या सर्व गुणांमुळे पुजारा भारतीय संघाचा आधारस्तंभ मानला जातो. कसोटी सामन्यातही पुजारा खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर त्याला बाद करणं कठीण असतं. अनेकदा प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी मुलाखतींमध्ये पुजाराच्या बाद करणं सर्वात कठीण असल्याचं मान्य केलं आहे. इतकच नव्हे तर भारतीय संघातले गोलंदाजही सरावादरम्यान पुजाराला बाद करण्यासाठी कट रचायचे.

सध्या भारतीय संघाबाहेर असलेला गोलंदाज भुवनेश्वर कुमारने काही दिवसांपूर्वी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक जुना फोटो पोस्ट केला होता. ज्यात भुवनेश्वर, शमी, बुमरहा आणि उमेश यादव हे गोलंदाज चर्चा करताना दिसत आहेत. भुवनेश्वरने या फोटोला, ज्यावेळी आम्ही पुजाराला बाद करण्यासाठी बाऊन्सर बॉल टाकण्याचा कट रचत होतो अशी कॅप्शन दिली आहे.

चेतेश्वर पुजारानेही भुवनेश्वरच्या या ट्विटला तितकंच मजेशीर उत्तर दिलं आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटपटू गेले अनेक दिवस सरावापासून दूर आहेत. भारताचा कसोटी संघातील नियमित सदस्य चेतेश्वर आणि सौराष्ट्र संघाचा कर्णधार जयदेव उनाडकट यांच्यासह यामोसमाचा रणजी विजेत्या सौराष्ट्र संघातील खेळाडूंनी तीन महिन्यांनंतर नेटमध्ये सराव करण्यास सुरुवात केली. पुजाराव्यतिरीक्त शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, इशांत शर्मा, रोहित शर्मा या खेळाडूंनीही सरावाला सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 7:17 pm

Web Title: when indian bowlers plan strategy to get out cheteshwar pujara bhuvaneshwar kumar revels on social media psd 91
Next Stories
1 सचिन की विराट? पाकिस्तानचा माजी खेळाडू म्हणतो…
2 सेहवागने शेअर केला घरावरून फिरणाऱ्या टोळांचा व्हिडीओ
3 पाकिस्तानचं चाललंय काय… करोना पॉझिटिव्ह १० पैकी ६ खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह
Just Now!
X