News Flash

त्यांना परवानगी नसेल तर आम्हीही येणार नाही ! जेव्हा धोनी प्रशिक्षकांसाठी ट्रिप रद्द करतो…

यू-ट्युब कार्यक्रमात बोलत असताना कर्स्टन यांनी सांगितला किस्सा

त्यांना परवानगी नसेल तर आम्हीही येणार नाही ! जेव्हा धोनी प्रशिक्षकांसाठी ट्रिप रद्द करतो…

महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदाच्या शैलीबद्दल आतापर्यंत आपण अनेकदा ऐकलं आणि वाचलं आहे. सौरव गांगुलीनंतर भारतीय संघाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव मोठं करण्यात आणि संघावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरलेला कर्णधार म्हणजे धोनी. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला. दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन हे त्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. एका यू-ट्युब शो मध्ये बोलत असताना कर्स्टन यांनी धोनीच्या मोठेपणाचा एक किस्सा सांगितला.

“कर्णधार म्हणून जे गूण असणं गरजेचं आहे ते सर्व गूण धोनीमध्ये आहेत. आतापर्यंत मी ज्या-ज्या प्रतिभावान खेळाडूंना भेटलोय, धोनी त्यातला एक आहे. तो नेहमी आपला संघ आणि सपोर्ट स्टाफ यांच्याशी एकनिष्ठ असतो. तो दिवस मी कधीही विसरणार नाही. विश्वचषकाआधी भारतीय संघाला बंगळुरुतील फ्लाईट स्कुलमध्ये आमंत्रण होतं. त्यावेळी संघात मी, पॅडी अपटन आणि एरिक सिम्नस असे ३ दक्षिण आफ्रिकन नागरिक होतो. सकाळी संघ फ्लाईट स्कुलला जायला निघणार तेवढ्यात आम्हाला समजलं की सुरक्षेच्या कारणास्तव मी आणि इतर दोघांना फ्लाईट स्कुलमध्ये प्रवेश मिळणार नाही.” कर्स्टन RK Show या यू-ट्युब कार्यक्रमात बोलत होते.

धोनीला याविषयी माहिती समजताच त्याने संपूर्ण संघाची ट्रिपच रद्द केली. ती लोकं आमच्या संघाचा भाग आहेत, जर त्यांना परवानगी मिळणार नसेल तर आम्हीही कोणी येणार नाही असं म्हणत धोनीने ट्रिप रद्द केल्याचं कर्स्टन यांनी सांगितलं. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी वर्षभर भारतीय संघाबाहेर आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामापासून धोनी क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार होता. परंतू करोनामुळे स्पर्धा पुढे ढकलली गेल्यामुळे धोनीचं पुनरागमन लांबणीवर पडलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 4:13 pm

Web Title: when ms dhoni cancelled a team trip because gary kirsten was not allowed entry psd 91
Next Stories
1 आयपीएलचा तेरावा हंगाम UAE मध्ये आयोजित करण्याचे संकेत, BCCI सूत्रांची माहिती
2 भाजीवाला ते डिलीव्हरी बॉय, करोनामुळे मुंबईतले फुटबॉल प्रशिक्षक आले रस्त्यावर
3 सेहवाग सलामीवीर होण्यामागे सचिन तेंडुलकरचा त्याग
Just Now!
X