News Flash

खाऊ दे मार ! जेव्हा धोनी शार्दुल ठाकूरला मदत करायला नकार देतो…

हरभजन सिंहने सांगितला किस्सा

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर, महेंद्रसिंह धोनीला निवड समितीने भारतीय संघात स्थान नाकारलं. यानंतर किमान वर्षभर धोनी क्रिकेटच्या मैदानावर उतरला नव्हता. आयपीएलच्या तेराव्या हंगामात धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. परंतू करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून धोनीचा संथ खेळ आणि त्याने क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारावी का?? या विषयावर चर्चा सुरु असते. परंतू धोनी हा आतापर्यंतचा भारताचा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे याच वादच नाही. धोनीचा चेन्नई सुपरकिंग्जचा साथीदार हरभजन सिंहने धोनीच्या कर्णधारपदाच्या शैलीबद्दलचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

“हे कर, ते कर असं धोनी तुम्हाला कधीच सांगत नाही. तुम्ही काय करु शकता ते सर्वोत्तम करा अशी त्याची अपेक्षा असते. जर तुम्हाला सहाही चेंडू ऑफ स्फिन टाकता येत असतील तर तसे टाका. कित्येकदा त्याने मला यष्टींमागून काही सूचना केल्या आहेत. परंतू मी कशी गोलंदाजी करावी हे त्याने कधीच सांगितलं नाही.” हरभजन सिंह ESPNCricinfo संकेतस्थळाशी बोलत होता. “एकदा पुण्यामध्ये सामना सुरु होता आणि शार्दुल ठाकूरची समोरचा फलंदाज चांगलीच धुलाई करत होता. पहिल्या-दुसऱ्या चेंडूवर त्याने खणखणीत षटकार ठोकले. हे पाहिल्यावर मी धोनीजवळ गेलो आणि त्याला म्हणालो तू त्याला काही सांगत का नाहीस?? चेंडूची दिशा बदल किंवा फिल्डरची जागा बदलायला सांग. यावर धोनी मला म्हणाला, हे बघ आता मी त्याला काही सांगायला गेलो तर तो गोंधळून जाईल, खाऊ दे मार.”

धोनीच्या कर्णधारपदाची हीच शैली आहे. त्यावेळी आम्ही बाद फेरीत दाखल झालो होतो म्हणून शार्दुलने कशीही गोलंदाजी केली तरी आम्हाला फरक पडत नव्हता. ज्यावेळी त्याला वाटेल की आता माझ्याकडे काहीच पर्याय उरला नाहीये, त्यावेळी मी त्याची मदत करेन, असं धोनी मला म्हणाला होता. त्यामुळे जोपर्यंत तुमच्याजवळचे सर्व पर्याय संपत नाही तोपर्यंत धोनी तुम्हाा कर्णधार म्हणून मदत करत नाही. दरम्यान आयपीएलचा तेरावा हंगाम सध्या स्थगित करण्यात आला आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणूनच वर्षाअखेरीस आयपीएलचं आयोजन करता येईल का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 1:27 pm

Web Title: when ms dhoni refused to help under fire shardul thakur at csk harbhajan singh reveals why psd 91
Next Stories
1 “चित्रपटाप्रमाणे प्रत्येक क्रिकेट सामना आधीच ठरलेला असतो”, बुकी संजीव चावलाचे धक्कादायक खुलासे
2 एकाच मैदानावर सामने खेळवण्याचा पर्याय!
3 .. म्हणून रोहित ‘आयपीएल’मधील सर्वोत्तम कर्णधार -लक्ष्मण
Just Now!
X